scorecardresearch

Premium

AUS vs PAK: ट्रॅविस हेडच्या नव्या निर्णयाने ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली; म्हणाला, “कसोटीत सलामीवीर होण्यास…”

AUS vs PAK Test Series: पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलियन संघाची डोकेदुखी वाढली आहे. ट्रॅविस हेडने सलामीला फलंदाजी करण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

AUS vs PAK: Travis Head decision raises Australia's headache Said Not ready to open in Tests
ट्रॅविस हेडने सलामीला फलंदाजी करण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. सौजन्य- (ट्वीटर)

Australia vs Pakistan Test Series, Travis Head: कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करणे हे खूप अवघड काम असल्याचे ट्रॅविस हेडचे मत आहे. त्याला कसोटीत स्टार डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या जागेवर फलंदाजी करण्यास सांगितले मात्र, त्याने सलामीला फलंदाजी करण्यास नकार दिला आहे. सलामीला  येऊन आपल्या विस्फोटक फलंदाजीने ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय विश्वचषकात विजय मिळवून देणारा हेड, पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलामीला फलंदाजीला करण्यास नाही म्हणत आहे. आगामी कसोटी मालिकेनंतर निवृत्त होणार्‍या वॉर्नरच्या जागी एक संभाव्य पर्याय म्हणून ऑस्ट्रेलिया ट्रॅविस हेडकडे पाहत आहे.

ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी नुकतेच सूचित केले होते की, “वॉर्नरच्या जागी हेडचा सलामीवीर म्हणून थेट वापर करता येणार नाही.” या वर्षाच्या सुरुवातीला दुखापतग्रस्त वॉर्नरची जागा हेडने भारतात घेतली, जिथे त्याने ऑस्ट्रेलियन संघाला विश्वचषक जिंकवून दिला. त्याने पाच डावात ५५.७५च्या सरासरीने गोलंदाजी केली.

England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
India Vs England 3rd Test Rohit Sharma Video Viral
IND vs ENG : रोहित शर्माने बूट उचलला, अन् जैस्वाल-सर्फराझसह इंग्लंडचे खेळाडू फिरले माघारी, VIDEO व्हायरल
Nasir Hussain believes Kohli unavailability is a loss for world cricket including India sport news
कोहलीच्या अनुपलब्धतेमुळे भारतासह जागतिक क्रिकेटचे नुकसान! इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांचे मत
Former England captain Michael Atherton Statement
IND vs ENG : जसप्रीत बुमराहसमोर बेन स्टोक्स वारंवार का अपयशी ठरतोय? इंग्लंडच्या माजी कर्णधाराने सांगितले कारण

हेही वाचा: टी-२० विश्वचषक आणि रोहित शर्माची फिटनेस याबाबत फिल्डिंग कोचचे सूचक विधान; म्हणाला, “ तो विराटसारखाच पण त्याचे वजन…”

मधल्या फळीत हेड चांगली फलंदाजी करतो

ट्रॅविस हेडने याबाबत सांगितले की, “मी मधल्या फळीत फलंदाजी करण्यास तयार आहे. त्या ठिकाणी मी संघाला थोडी स्थिरता देऊन विस्फोटक फलंदाजी करू शकतो.” त्याला विश्वास होता की कसोटीत वॉर्नरची जागा कोणीतरी घेईल, ज्यात माजी कसोटी सलामीवीर कॅमेरून बॅनक्रॉफ्ट, मॅथ्यू रेनशॉ आणि मार्कस हॅरिस यांचा समावेश आहे, जे गेल्या आठवड्यात पाकिस्तानविरुद्ध प्लेईंग-११ सामन्यात खेळले होते.

मधल्या फळीत निवडकर्ते माझ्यावर खूश आहेत, असे ट्रॅविस हेडने गुरुवारी पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी पर्थ येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. “मला वाटते हे संघ व्यवस्थापन आणि तज्ञ क्रिकेटपटूंचे काम आहे. जे काही काळापासून माझी संघात येण्याची वाट पाहत आहेत. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी योग्य ते सर्वकाही माझ्याकडून देईन. माझ्या फलंदाजीबाबत सर्वांशी चर्चा सुरू आहे मात्र, फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे उपखंडात खेळताना येणाऱ्या अडचणींवर मात करणे. मला भविष्यात अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी मी सध्या कमी प्रवास करत आहे.”

हेही वाचा: Day-Night Test: BCCIला भारतात दिवस-रात्र कसोटीचे आयोजन का नाही करायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

हेड पुढे म्हणाला, “दुखापतीनंतर माझी मानसिक स्थिती मजबूत झाली आहे. कसोटीत सलामीवीर होण्यास अजूनही मी तयार नाही.” हेडने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी सलामीला फलंदाजी करण्यास नकार दिल्याने संघ व्यवस्थापन पर्यायी खेळाडू शोधत आहे. भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत त्याने फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. हेड हा ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या संघातील एकमेव खेळाडू होता जो त्या मालिकेत खेळत होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aus vs pak why did travis head refuse to become a test opener this is the big reason avw

First published on: 11-12-2023 at 17:09 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×