ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने क्रिकेट विश्वात इतिहास रचताना एक मोठा विक्रम केला आहे. त्याने आपला १००वा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला, ज्यामध्ये त्याने द्विशतक झळकावले. मात्र यादरम्यान वॉर्नरने जोरदार आनंद साजरा केला आणि तो जखमी झाला. यानंतर त्याला दुखापतग्रस्त रिटायर व्हावे लागले. त्याने २५४ चेंडूत २०० धावा केल्या. यादरम्यान त्याने १६ चौकार आणि दोन षटकार मारले.

सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघामध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डविड वॉर्नर याने एक दैदिप्यमान कामगिरी केली आहे. त्याने आपल्या १००व्या कसोटी सामन्यात शतक झळकावत मैलाचा दगड पार केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील १०वा तर ऑस्ट्रेलियाचा दुसरा फलंदाज ठरला आहे. वॉर्नरच्या या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलिया संघ या कसोटी सामन्यात मजबूत स्थितीत आला आहे आणि भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे. जर या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला, तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाण्याचा भारताचा मार्ग सुकर होईल.

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 : केएल राहुलने वर्षानुवर्षे धोनीच्या नावे असलेला मोठा विक्रम मोडला, ही कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad Updates in marathi
IPL 2024 : ट्रॅव्हिस हेडने झळकावले वादळी शतक, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा खेळाडू
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अ‍ॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: विराट कोहलीला आऊट करत घेतली आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट, कोण आहे मनिमरण सिध्दार्थ?

वॉर्नरने याआधी एकदिवसीय क्रिकेटमधील १०० व्या सामन्यातही शतक झळकावले होते. अशाप्रकारे डेव्हिड वॉर्नर आपल्या कारकिर्दीतील १००व्या एकदिवसीय आणि १००व्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा जगातील दुसरा आणि ऑस्ट्रेलियातील पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी वेस्ट इंडिजचा सलामीवीर गॉर्डन ग्रीनिजने ही कमाल केली होती. माजी कॅरेबियन खेळाडू आपल्या १००व्या वनडे आणि १००व्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा जगातील पहिला खेळाडू ठरला. त्याच्यानंतर आता वॉर्नरने ही कामगिरी केली आहे. याआधी २८ सप्टेंबर २०१७ रोजी वॉर्नरने आपल्या १००व्या वनडेत शतक झळकावले होते. हा सामना टीम इंडिया विरुद्ध बेंगळुरूमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये वॉर्नरने १२४ धावांची खेळी केली.

हेही वाचा: केएल राहुल ऐवजी ‘हा’ २४ वर्षाचा खेळाडू रोहितसोबत सलामीला असणार…, २०२३ विश्वचषकासाठी ब्रेट लीचे भाकीत

आता वॉर्नरने कारकिर्दीतील १००व्या कसोटीत शतक झळकावून हा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात वॉर्नरने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात द्विशतक झळकावले आहे. त्याने २५४ चेंडूत २०० धावांची खेळी खेळली. यादरम्यान वॉर्नरने दोन षटकार आणि १६ चौकार लगावले.

सचिन तेंडूलकरच्या विक्रमाची बरोबरी

कांगारू फलंदाज डेव्हिड वॉर्नरने बीच बॉक्सिंग डे कसोटीमध्ये एक खास कामगिरी केली आहे. त्याने आपल्या १००व्या कसोटीत शतक झळकावले आहे. अशी कामगिरी करणारा तो १०वा फलंदाज ठरला आहे. त्याच वेळी, इतर ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत ज्यांनी ही कामगिरी केली आहे. रिकी पॉन्टिंगने हे काम वॉर्नरच्या आधी केले होते. या शतकासह वॉर्नरने सचिनच्या खास विक्रमाची बरोबरी केली आहे. सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके ठोकणारा तो फलंदाज ठरला आहे. सचिनने डावाची सुरुवात करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५ शतके झळकावली आहेत आणि वॉर्नरनेही अशीच कामगिरी केली आहे.

सेलिब्रेशन करताना वॉर्नर जखमी झाला

वॉर्नर १९६ धावांवर असताना त्याने चौकार मारून २०० धावा पूर्ण केल्या. यानंतर त्याने हवेत उडी मारून आनंद साजरा केला. मात्र यादरम्यान जमिनीवर येताना त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याच्या डाव्या पायात ताण आला होता. तो वेदनेने ओरडू लागला. वॉर्नरला त्याचा सहकारी फलंदाज ट्रॅव्हिस हेडने साथ दिली. यानंतर वैद्यकीय पथक मैदानावर पोहोचले. त्या दुखापतीमुळे त्याला रिटायर व्हावे लागले. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.