ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला पुढील आठवड्यात सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघाची घोषणा केली आहे. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी महत्त्वाचा गोलंदाज जोश हेझलवूड संघाचा भाग नाही. निवडकर्त्यांनी प्रोटीजविरुद्धच्या मालिकेसाठी १४ जणांचा संघ जाहीर केला आहे. पहिला सामना १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे.

अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड अजूनही एका बाजूच्या ताणाशी झुंज देत आहे. शनिवारी गॅबा येथे सुरू होणाऱ्या लढतीतून तो बाहेर पडला आहे. तथापि, निवडकर्त्यांना आशा आहे की, वेस्ट इंडिजविरुद्धच्या गुलाबी चेंडूच्या कसोटीसाठी संघाचा भाग नसलेला कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीतून बरा होईल. तसेच पहिल्या सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त होईल. त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथने संघाची कमान सांभाळली होती.

मुख्य निवडकर्ते जॉर्ज बेली म्हणाले, “पॅट कमिन्समध्ये सुधारणा होत आहे. त्याने शनिवारी गोलंदाजी केली आणि या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. मात्र, जोश हेझलवूडला पूर्णपणे सावरण्यासाठी अजून वेळ लागेल. हे लक्षात घेऊन, आम्ही मायकेल नेसर आणि लान्स मॉरिस यांना संघात ठेवले आहे.” ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा २-० असा व्हाईटवॉश केला. ही मालिका देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा एक भाग आहे.

हेही वाचा – IND vs BAN 1st Test: रोहित, जडेजा आणि शमी पहिल्या सामन्यातून बाहेर; ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ:

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, मायकेल नेसर आणि मिचेल स्टार्क.