scorecardresearch

IND vs BAN 1st Test: रोहित, जडेजा आणि शमी पहिल्या सामन्यातून बाहेर; ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

निवडकर्त्यांनी शमी आणि जडेजाच्या जागी अनुक्रमे नवदीप सैनी आणि सौरभ कुमारची निवड केली. निवड समितीने वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचाही कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश केला आहे.

IND vs BAN 1st Test: रोहित, जडेजा आणि शमी पहिल्या सामन्यातून बाहेर; ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
भारतीय कसोटी संघ ( फोटो-बीसीसीआय ट्विटर)

भारत आणि बांगलादेश संघांतील तीन वनडे सामन्याची मालिका नुकतीच पार पडली. ही मालिका बांगलादेश संघाने २-१ फरकाने जिंकली. या मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश संघांत दोन सामन्यांची कसोटी खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला १४ दिसेंबरला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी टीम इंडियाला दुखापतीने ग्रासले आहे. त्यामुळे प्रमुख खेळाडूंच्या जागी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने डाव्या हाताच्या अंगठ्याच्या दुखापतीसाठी मुंबईत एका तज्ज्ञ डॉक्टराची भेट घेतली आहे. त्याला दुखापतीचे योग्य व्यवस्थापन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी तो अनुपलब्ध असणार आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक दुसऱ्या आणि अंतिम कसोटीसाठी त्याच्या उपलब्धतेबाबत नंतर निर्णय घेईल. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने पहिल्या कसोटीसाठी त्याच्या जागी अभिमन्यू ईश्वरनची निवड केली आहे.

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा अद्याप खांद्याच्या आणि गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरे झाले नाहीत. त्यामुळे ते दोघे कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहेत. निवडकर्त्यांनी शमी आणि जडेजाच्या जागी अनुक्रमे नवदीप सैनी आणि सौरभ कुमारची निवड केली. निवड समितीने वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचाही कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश केला आहे.

भारतीय कसोटी संघ: केएल राहुल (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इसवरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार आणि जयदेव उनाडकट.

हेही वाचा – INDW vs AUSW: भारतीय महिला संघाने विक्रमी प्रेक्षकांसमोर केले ‘ते’ काम; जग पाहतच राहिले, बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ

बांगलादेशचा कसोटी संघ: महमुदुल हसन जॉय, एमडी मेहदी हसन मिराज, मोहम्मद नजमुल हुसेन शांतो, एमडी तैजुल इस्लाम, मोमिनुल हक, तस्कीन अहमद, यासिर अली चौधरी, सय्यद खालिद अहमद, एमडी मुशफिकुर रहीम, इबादत हुसेन चौधरी, शाकिब अल हसन (कर्णधार), एमडी शोरफुल इस्लाम, लिटन कुमार दास, झाकीर हसन, काझी नुरुल हसन सोहन, रेझाउर रहमान राजा आणि अनामुल हक बिजॉय.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2022 at 10:38 IST

संबंधित बातम्या