कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (४३ चेंडूंत ६५ धावा) निर्णायक खेळीनंतरही तळाच्या फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध चुरशीच्या झालेल्या महिला ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताने नऊ धावांनी हार पत्करली. या पराभवामुळे भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

राष्ट्रकुलमधील सुवर्णपदकासाठी झालेल्या अंतिम लढतीत १६२ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताचा डाव १९.३ षटकांत १५२ धावांत संपुष्टात आला. सलामीवीर शफाली वर्मा (११) आणि स्मृती मानधना (६) लवकर बाद झाल्याने भारताची २ बाद २२ अशी स्थिती झाली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत आणि मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने (३३) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ९६ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी रचली. मात्र, सलग दोन षटकांत जेमिमा, हरमनप्रीत आणि पूजा वस्त्रकार (१) बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला. यानंतर तळाच्या फलंदाजांना फारसे योगदान देता आले नाही. त्यामुळे १५व्या षटकात २ बाद ११८ अशी धावसंख्या असणाऱ्या भारताचा डाव १५२ धावांत आटोपला.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

त्यापूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ८ बाद १६१ अशी धावसंख्या उभारली. बेथ मूनी (४१ चेंडूंत ६१ धावा), कर्णधार मेग लॅिनग (२६ चेंडूंत ३६) आणि  गार्डनरने (१५ चेंडूंत २५) योगदान देत ऑस्ट्रेलियाला १६० धावांपलीकडे पोहोचवले.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ८ बाद १६१ (बेथ मूनी ६१, मेग लॅिनग ३६; स्नेह राणा २/३८, रेणुका सिंग २/२५) विजयी वि. भारत : १९.३ षटकांत सर्वबाद १५२ (हरमनप्रीत कौर ६५, जेमिमा रॉड्रिग्ज ३३; अ‍ॅश्ले गार्डनर ३/१६)