Australia Mocks No Handshake Controversy: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारताच्या दोन दिग्गज खेळाडूंचं संघात पुनरागमन झालं आहे. वनडे मालिकेनंतर टी-२० मालिकाही खेळवली जाणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडिया १५ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. या दौऱ्यापूर्वी आता एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी टीम इंडियाच्या नो हँडशेक वादाची खिल्ली उडवली आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्यांनी आशिया चषक २०२५ दरम्यान झालेल्या नो हँडशेक वादाची खिल्ली उडवली, याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

आशिया चषक २०२५ दरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध तीन सामने खेळले आणि तिन्ही सामन्यांपैकी एकाही सामन्यात हस्तांदोलन केलं नाही. याशिवाय अंतिम सामन्यापूर्वी संघाने ट्रॉफीबरोबर फोटोशूट करण्यासही नकार दिला होता.

भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याआधी, ऑस्ट्रेलियन संघाचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ते हँडशेक न करण्याच्या वादाची खिल्ली उडवत आहेत.

एका व्हिडिओमध्ये सुरूवातीला अँकर म्हणत आहे की, “आपल्या सर्वांना माहित आहे, भारतीय संघ ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला आहे. आम्हाला त्यांची एक मोठी कमजोरी समजली आहे. आम्हाला सर्वांना माहित आहे की त्यांना पारंपारिक अभिवादन (हँडशेक) करणं आवडत नाही. गोलंदाजी करण्यापूर्वीच आपण त्यांना मागे टाकू शकतो. यानंतर, जोश हेझलवूड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, जॅक फ्रेझर-मॅकगर्क आणि इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी हस्तांदोलन करण्याऐवजी वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांना अभिवादन करून दाखवलं.

भारताविरूद्ध मालिकेपूर्वी हस्तांदोलनाच्या वादाची ऑस्ट्रेलियाने उडवलेली खिल्ली पाहता चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाकिस्तानशी असलेल्या तणावपूर्ण संबंधांमुळे भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला होता.

भारताचं ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेसाठी वेळापत्रक

भारत वि. ऑस्ट्रेलिया वनडे मालिका

१९ ऑक्टोबर – भारत वि. ऑस्ट्रेलिया – पहिली वनडे – पर्थ
२३ ऑक्टोबर – भारत वि. ऑस्ट्रेलिया- दुसरी वनडे – एडलेड
२५ ऑक्टोबर – भारत वि. ऑस्ट्रेलिया – तिसरी वनडे – सिडनी

भारत वि. ऑस्ट्रेलिया टी-२० मालिका वेळापत्रक

२९ ऑक्टोबर – भारत वि. ऑस्ट्रेलिया – पहिला टी-२० सामना – कॅनबेरा
३१ ऑक्टोबर – भारत वि. ऑस्ट्रेलिया – दुसरा टी-२० सामना – मेलबर्न
२ नोव्हेंबर – भारत वि. ऑस्ट्रेलिया – तिसरा टी-२० – होबार्ट
६ नोब्हेंबर – भारत वि. ऑस्ट्रेलिया – चौथा टी-२० सामना – गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर – भारत वि. ऑस्ट्रेलिया – पाचवा टी-२० सामना – ब्रिस्बेन