ग्रॉस आइलेट (सेंट लुशिया) : सलामीवीर ट्रॅव्हिस हेड (६८) आणि अष्टपैलू मार्कस स्टोइनिस (५९) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट सामन्यात स्कॉटलंडला पाच गडी राखून नमवले. या विजयामुळे इंग्लंडच्या संघाने ‘अव्वल आठ’ मधील आपले स्थान निश्चित केले.

स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १८० धावा केल्या. तर, ऑस्ट्रेलियाने १९.४ षटकांत ५ बाद १८६ धावा करत विजय नोंदवला. स्कॉटलंडने एकवेळ ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ६० अशी बिकट केली होती. मात्र, हेड आणि स्टोइनिस यांनी चौथ्या गड्यासाठी ८० धावांची भागीदारी रचत संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने या विजयानंतर ‘ब’ गटातील आपले शीर्षस्थान कायम राखले. स्कॉटलंड पराभूत झाल्याने इंग्लंडचा संघ गटात दुसऱ्या स्थानी राहिला. इंग्लंडने यापूर्वी पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात नामिबियाला डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार ४१ धावांनी नमवले. मात्र, ऑस्ट्रेलियाला विजय मिळवणे गरजेचे होते. तर, इंग्लंडला त्याचा फायदा होता. ऑस्ट्रेलियाने आपल्या गटातील चारही सामने जिंकले तर, इंग्लंड आणि स्कॉटलंड यांचे पाच समान गुण झाले. मात्र, इंग्लंडची निव्वळ धावगी चांगली राहिल्याने त्यांनी पुढच्या फेरीत आगेकूच केली.

हेही वाचा >>>Fathers Day 2024: अनुष्का शर्माचं विराटला ‘फादर्स डे’ निमित्त खास सरप्राईज, वामिका आणि अकायने खास अंदाजात केलं विश

आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (१), कर्णधार मिचेल मार्श (८) आणि ग्लेन मॅक्सवेल (११) हे लवकर बाद झाले. स्कॉटलंडच्या गोलंदाजांना हेड व स्टोइनिसवर दबाव निर्माण करता आला नाही. त्यांनी ४४ चेंडूंत ८० धावांची भागीदारी केली. यानंतर टिम डेव्हिडने १४ चेंडूंत नाबाद २४ धावांची खेळी केली व संघाला विजय मिळवून दिला. त्यापूर्वी, स्कॉटलंडकडून ब्रेंडन मॅकमुलेन याने ३४ चेंडूंत ६० धावांची खेळी करत संघाला सुस्थितीत पोहोचवले.

आजचे सामने

श्रीलंका वि. नेदरलँड्स

● वेळ : पहाटे ६ वा.

न्यूझीलंड वि. पापुआ न्यू गिनी

● वेळ : रात्री ८ वा.

● वेळ : पहाटे ५ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, हॉटस्टार अॅप