Pat Cummins poses with the ICC World Cup trophy on a Sabarmati river cruise boat: ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये जल्लोषाचे वातावरण अजून कायम आहे. न्यूज एजन्सी एएनआयने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो साबरमती नदीवरील क्रूझवर ट्रॉफीसोबत फोटोशूट करताना दिसत आहे. यावेळी इतर लोकही तिथे उपस्थित असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना न्यूज एजन्सीने लिहिले आहे की, ‘ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार पॅट कमिन्स अहमदाबादमधील साबरमती नदीच्या क्रूझवर वर्ल्ड कपसोबत पोज देताना.’

पॅट कमिन्स या विजयाने खूप आनंदी –

भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यातील विजयानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार खूप आनंदी आहे. सामन्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना तो म्हणाला, ‘माझ्या मते गेल्या सामन्यातील आमची सर्वोत्तम कामगिरी आम्ही राखून ठेवली होती. तसेच मोठ्या सामन्यांमध्ये काही खेळाडूंची सर्वोत्तम कामगिरी समोर आली आहे.’

ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पुढे म्हणाला, ‘लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय योग्य ठरेल, असे सामन्यापूर्वी आम्हाला वाटले होते. खेळपट्टी खूपच संथ दिसत होती. फिरकीपटूंना फारशी मदत मिळत नव्हती. आम्ही अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. ज्याचा आम्हाला फायदा झाला.’

हेही वाचा – आयसीसीकडून सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन जाहीर, चॅम्पियन कर्णधाराला मिळाले नाही स्थान; भारताच्या ६ खेळाडूंचा समावेश

सामन्याबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रथम फलंदाजी करायला उतरलेला भारतीय संघ ५० षटकांत २४० धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ विकेट गमावत २४१ धावा करत सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक १३७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या.

हेही वाचा – VIDEO: फायनलमधील पराभवानंतर गौतम गंभीरने जिंकली भारतीयांची मनं; म्हणाला, “केवळ जिंकणारा संघच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्पूर्वी, भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ आणि विराट कोहलीने ५४ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने ४७ आणि सूर्यकुमार यादवने १८ धावा केल्या. कुलदीप यादवने १० धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय इतर कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. त्याचबरोबर भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकले होते, मात्र ११व्या सामन्यात संघ मागे पडला. भारताला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने शेवटचा पराभव २००३ मध्ये केला होता.