भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. तिथे भारताला विंडीजविरुद्द एकूण १० सामने खेळायचे आहेत. यात दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने अशा एकूण तीन मालिका खेळायच्या आहेत. १२ जुलैपासून उभय संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. परंतु भारतीय संघ त्याच्या एक महिना आधीच कॅरेबियन बेटांवर दाखल होणार आहे. भारताची अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे भारताचं शेड्यूल व्यस्त नाही. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पहिल्या कसोटीच्या किमान १० दिवस अगोदरच टीम इंडियाला कॅरेबियन बेटांवर पाठवणार आहे. भारतीय क्रिकेटपटू तिथे जाऊन तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतील. भारतीय संघ १ जुलैपर्यंत वेस्ट इंडिजला पोहोचेल.
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे. एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही मालिकांमध्ये रोहित शर्मा भारताच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. कसोटीत अजिंक्य रहाणे उपकर्णधार असेल तर एकदिवसीय मालिकेत हार्दिक पांड्याकडे ही जबाबदारी असेल.
बीसीसीआयने आधीच भारताचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार १२ जुलैपासून उभय संघांमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होईल. तर २७ जुलैपासून एकदिसीय मालिका खेळवली जाईल. ३ ऑगस्टपासून पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होईल. कॅरेबियन बेटांवरील पोर्ट ऑफ स्पेन, गयाना, फ्लोरिडा आणि डॉमिनिका येथे उभय संघांमधील १० सामने खेळवले जातील.
भारतीय संघाचं वेळापत्रक
पहिला कसोटी सामना – १२ जुलै ते १६ जुलै, डॉमिनिका
दुसरा कसोटी सामना – २० जुलै ते २४ जुलै, पोर्ट ऑफ स्पेन
पहिला एकदिवसीय सामना – २७ जुलै, ब्रिजटाउन
दुसरा एकदिवसीय सामना – २९ जुलै, ब्रिजटाउन
तिसरा एकदिवसीय सामना – १ ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
पहिला टी-२० सामना – ३ ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
दुसरा टी-२० सामना – ६ ऑगस्ट, गयाना
तिसरा टी-२० सामना – ८ ऑगस्ट, गयाना
चौथा टी-२० सामना – १२ ऑगस्ट, फ्लोरिडा
पाचवा टी-२० सामना – १३ ऑगस्ट, फ्लोरिडा
भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.
हे ही वाचा >> IND vs WI Test Team : वेस्ट इंडिज दौऱ्यावर BCCI कडून अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी, ऋतुराजसाठी गूड न्यूज!
भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल. कुलदीप यादव, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.