scorecardresearch

BCCI Annual Contract: भुवनेश्वर-रहाणेला स्पष्ट संकेत, केएल राहुलला इशारा; BCCIच्या केंद्रीय कराराचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

BCCI Central Contracts: बीसीसीआयने २०२२-२३ हंगामासाठी केंद्रीय करार जाहीर केले आहेत. त्यात भुवनेश्वर कुमारसह अनेक बड्या नावांना डच्चू मिळाला आहे, तर युवा खेळाडूंचे प्रमोशन झाले. बीसीसीआयच्या नव्या कराराचा अर्थ काय जाणून घ्या.

Clear signal to Bhuvneshwar and Rahane warning to KL Rahul what to understand from BCCI's central contract
सौजन्य- (ट्विटर)

BCCI Central Annual Contract: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आली. बीसीसीआयने रविवारी खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर केला, ज्यामध्ये काही खेळाडूंना बढती देण्यात आली आणि खराब फॉर्ममध्ये झगडणाऱ्या एका अनुभवी खेळाडूला डिमोशन मिळाले. BCCI खेळाडूंना चार वेगवेगळ्या श्रेणींसाठी वार्षिक करार देते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी २०२२-२३ हंगामासाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे केंद्रीय करार जाहीर केले. बीसीसीआयने २६ क्रिकेटपटूंना रिटेनरशिप सोपवली आहे. बीसीसीआय चार श्रेणींमध्ये खेळाडूंना करार देते. A+ श्रेणीतील खेळाडूंना ७ कोटी रुपये, A श्रेणीला ५ कोटी रुपये, B श्रेणीला ३ कोटी रुपये आणि C श्रेणीला १ कोटी रुपये मिळतात. नवीन केंद्रीय करारामुळे बीसीसीआयने अनेक गोष्टी अगदी स्पष्ट केल्या आहेत. आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगत आहोत.

भुवी-रहाणेसह या दिग्गजांची कारकीर्द संपली?

भुवनेश्वर कुमार यांच्यासह अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा आणि वृद्धिमान साहा या खेळाडूंना बीसीसीआयने या यादीत स्थान दिलेले नाही. काही काळापूर्वी हे सर्वजण संघाचे प्रमुख खेळाडू होते. पण आता बीसीसीआयने त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्वचितच संधी मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत. एकप्रकारे त्यांना संघातून डच्चू मिळाला असून आगामी खूप खडतर असणार आहे.

शिखरची गोष्ट संपलेली नाही

भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज सलामीवीर शिखर धवन सध्या संघाबाहेर आहे. त्याच्या पुनरागमनाचीही आशा मावळली असे काहीजण म्हणत होते, पण बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याला सी श्रेणीत ठेवण्यात आले आहे. धवन अजूनही पुनरागमन करू शकेल असाच याचा अर्थ घेतला जात आहे. यंदा विश्वचषक असून धवनला आयसीसी स्पर्धांमध्ये खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे, त्यासाठी त्याचा नक्की विचार केला जाऊ शकतो.

हेही वाचा: WPL 2023, MIW vs DCW: “मै तो रुकने ही वाली…”, सामन्यानंतर वादग्रस्त नो-बॉलवर शफाली वर्माचे सूचक विधान

केएल राहुलला इशारा

भारतीय संघासाठी केएल राहुलच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे. त्याच्याकडून एकदिवसीय आणि टी२० नंतर कसोटी उपकर्णधारपदही काढून घेण्यात आले होते. आता त्याला केंद्रीय करारातही पद्च्चूत करण्यात आले आहे. मागच्या वेळी राहुल A मध्ये होता पण यावेळी तो B मध्ये आहे. खेळात सुधारणा न झाल्यास त्याला वगळले जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा बीसीसीआयने राहुलला दिल्याचे समजते.

जडेजाच्या पुनरागमनानंतरही अक्षर महत्त्वाचा

रवींद्र जडेजा दुखापतीतून परतला असून त्याच्या अनुपस्थितीत अक्षर पटेलने फलंदाजी आणि गोलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी केली. जडेजा दुखापतीतून परतल्यानंतरही अक्षरने चांगली कामगिरी केली आहे. या कारणास्तव त्यांची ब श्रेणीतून अ श्रेणीत पदोन्नती करण्यात आली आहे. यावरूनच जडेजाच्या पुनरागमनानंतरही अक्षरची भूमिका महत्त्वाची असणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

‘द-स्काय’ अशी ओळख असणारा सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल यांना सी वरून बी श्रेणीत आणले आहे. शार्दुल ठाकूर बी वरून सी श्रेणीत गेला आहे. अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा याआधी बी ग्रेडमध्ये होते. यावेळी दोघांनाही केंद्रीय करारातून वगळण्यात आले आहे. इशान किशन, दीपक हुडा, कुलदीप यादव, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग आणि केएस भरत हे यापूर्वी केंद्रीय कराराचा भाग नव्हते. या खेळाडूंना यावेळी सी दर्जाचे कंत्राट देण्यात आले आहे.

हेही वाचा: WPL 2023, MIW vs DCW: मुंबईच्या आक्रमणापुढे दिल्ली नेस्तनाबूत! MIच्या रणरागिणींनी पहिल्यावहिल्या WPL ट्रॉफीवर कोरले नाव

पुरुषांसाठी बीसीसीआय करार यादी:

A+ श्रेणी: रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा

ग्रेड अ श्रेणी: हार्दिक पंड्या, आर अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, अक्षर पटेल

ग्रेड बी श्रेणी: चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, शुबमन गिल

ग्रेड क श्रेणी: उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, इशान किशन, दीपक हुडा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 11:42 IST

संबंधित बातम्या