Team India Head Coach and Support Staff Time Extended: बीसीसीआयने बुधवारी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफच्या कराराची मुदतवाढ जाहीर केली. नुकत्याच संपलेल्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ नंतर त्यांचा करार संपला होता. यानंतर बीसीसीआयने द्रविडशी चर्चा करून कार्यकाळ वाढवण्यास सहमती दर्शवली. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ किती दिवसांसाठी वाढवला याची माहिती दिलेली नाही.

बीसीसीआयने त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले की, “भारतीय संघाच्या उभारणीत राहुल द्रविडने बजावलेली महत्त्वाची भूमिका बोर्ड ओळखते आणि त्याच्या शानदार कामगिरी आणि मेहनतीचे आम्ही सर्व परिचित आहोत. व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या एनसीएचे प्रमुख आणि स्टँड-इन हेड कोच या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल बोर्ड त्यांचे कौतुक करते. त्यांच्या प्रसिद्ध ऑन-फिल्ड भागीदारीप्रमाणेच, द्रविड आणि लक्ष्मण यांनी भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी एकत्र काम केले आहे.”

Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Revenue Secretary Sanjay Malhotra to be the new RBI Governor for a period of 3 years!
RBI Governer : संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर, पुढील तीन वर्षे असेल कार्यकाळ
Sharad Pawar On Mamata Banerjee
Sharad Pawar : ‘ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता’; शरद पवारांचं मोठं विधान
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “माझ्याकडे खूप अनुभव, तरीही यावेळी प्रेशर अनुभवतोय”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
I am happy to be Devendra Fadnavis s elder sister as he becomes Chief Minister again
देवेंद्र लहानपणापासून खोडकर पण…मोठी बहीण स्वाती फडणवीस साठे यांचा आठवणींना उजाळा
memories devendra fadnavis school classmates nagpur
शाळेत शेवटच्या बाकावर बसणारा देवेंद्र पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सर्वोच्च खुर्चीवर, शाळेतील विद्यार्थ्यानी सांगितल्या त्यावेळच्या आठवणी….
Devendra fadnavis
Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस विदर्भातील पाचवे, नागपुरातील दुसरे मुख्यमंत्री

बीसीसीआयच्या प्रेस रिलीझमध्ये म्हटले आहे की, “नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ नंतर त्यांचा मुख्य प्रशिक्षकाचा करार संपला होता. यानंतर बीसीसीआयने राहुल द्रविड यांच्याशी अर्थपूर्ण चर्चा केली आणि सर्वांच्या संमतीने करार वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.”

कार्यकाळ वाढवल्यावर द्रविड काय म्हणाला?

कार्यकाळ वाढवण्याबाबत द्रविड म्हणाला, “टीम इंडियाबरोबरची गेली दोन वर्षे संस्मरणीय राहिली आहेत. आम्ही एकत्र चढ-उतार पाहिले आहेत आणि या संपूर्ण प्रवासात संघात पाठिंबा आणि सौहार्द या दोन्ही गोष्टी होत्या. ड्रेसिंग रूममध्ये आम्ही निर्माण केलेल्या संस्कृतीचा मला खरोखर अभिमान आहे. आमच्या संघात असलेले कौशल्य आणि प्रतिभा वाखाणण्याजोगी आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि माझ्या कार्याला पाठिंबा दिल्याबद्दल मी बीसीसीआय आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो.”

हेही वाचा: Rahul Dravid: बीसीसीआयने द्रविड समोर ठेवला नवा पर्याय; म्हणाले, “टीम इंडियाचे प्रशिक्षक…”

रॉजर बिन्नी म्हणाले- ही परस्पर आदराची बाब आहे

द्रविडचा कार्यकाळ वाढवल्याबद्दल बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले, “राहुल द्रविडची दूरदृष्टी, मेहनत आणि दृढनिश्चय हे टीम इंडियाच्या यशाचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक या नात्याने तुम्ही नेहमीच अग्निपरीक्षा दिल्या आहेत. तुम्ही मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर स्वीकारली याचा मला आनंद आहे. हा परस्पर आदराचा विषय आहे. तुमच्या नेतृत्वाखाली संघ यशाच्या शिखरावर पोहोचेल यात मला शंका नाही.”

हेही वाचा: Kapil Dev: “इतक्या अपेक्षा ठेवू नका की…”, विश्वचषक फायनलमधील टीम इंडियाच्या पराभवावर कपिल देव यांचे मोठे विधान

जय शहा यांनी द्रविडचे कौतुक केले

बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, “मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी राहुल द्रविडपेक्षा चांगला कोणी असू शकत नाही, असे मी त्याच्या नियुक्तीच्या वेळी नमूद केले होते आणि त्याने आपल्या कामगिरीने स्वत:ला पुन्हा सिद्ध केले आहे. सर्व फॉरमॅट्समध्ये टीम इंडिया आता एक मजबूत संघ आहे. तिन्ही फॉरमॅटमधील आमची आयसीसीतील क्रमवारी ही त्याची दूरदृष्टी, मार्गदर्शन आणि संघासाठी तयार केलेला रोडमॅप थेट प्रतिबिंबित करते. संघाच्या वाढीसाठी योग्य व्यासपीठ तयार केल्याबद्दल मुख्य प्रशिक्षक द्रविड कौतुकास पात्र आहेत. मुख्य प्रशिक्षकाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व समर्थन देण्यासाठी आम्ही नक्कीच मदत करू.”

Story img Loader