Rinku Singh, India vs West Indies:  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने बुधवारी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय टी२० संघाची घोषणा केली. बीसीसीआयने या मालिकेसाठी एकूण १५ खेळाडूंची निवड केली असून यामध्ये यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा यांना प्रथमच संघात स्थान मिळाले आहे. या संघात चार फिरकीपटू, तीन सलामीवीर, दोन यष्टिरक्षक आणि चार वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर क्रिकेटपंडितांनी आपापले विश्लेषण करून वेगवेगळी मते द्यायला सुरुवात केली. या यादीत भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने तिलक वर्मा याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे, जिथे टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी२० मालिका खेळताना दिसणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात १२ जुलैपासून पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे, ज्यासाठी दोन्ही संघ तयारी करत आहेत. त्याचवेळी टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. त्याचबरोबर काही खेळाडू असे आहेत ज्यांची आयपीएलमध्ये कामगिरी अप्रतिम राहिली आहे, पण तरीही त्यांना संघात संधी मिळालेली नाही. रिंकू सिंगला संधी मिळेल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही.

हेही वाचा: MS Dhoni Birthday: BCCIला धोनीसाठी हा ‘नियम’ तोडावा लागला, वयाच्या २३व्या वर्षी पाकिस्तानला दाखवले अस्मान

दुसरीकडे, रिंकू सिंगला संधी न मिळाल्याने टीम इंडियाचा माजी खेळाडू आकाश चोप्राने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या मते, “जर तिलक वर्माला संघात लोअर ऑर्डरला फलंदाजी करण्यासाठी निवडले गेले तर तो चुकीचा निर्णय ठरेल”, असे त्याचे म्हणणे आहे. त्याच्या जागी खालच्या फळीत म्हणजेच लोअर ऑर्डरला फलंदाजीसाठी रिंकू सिंग हा चांगला पर्याय ठरला असता.

मला वाटत नाही की टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्माला संधी देईल – आकाश चोप्रा

स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाले की, “मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांचा समावेश आहे. पण मला वाटत नाही की टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्माला खेळवण्याचा विचार करत असेल. जर ते हार्दिक पांड्यानंतर फलंदाजीची सलामी देऊ शकणारा खेळाडू शोधत असते, तर मला वाटते रिंकू सिंग ही एक चांगली निवड ठरली असती.”

हेही वाचा: MS Dhoni Birthday: एम.एस. धोनीच्या ४२व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी हैदराबादमध्ये लावले तब्बल ५२ फुटाचे कट-आउट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपला मुद्दा पुढे चालू ठेवत समालोचक आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, “भारत तिलक वर्माला वरच्या क्रमवारीत फलंदाजीची संधी देणार नाही, कारण इशान किशन आणि संजू सॅमसन हे टॉप-थ्रीमध्ये असतील. टीम इंडिया १२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे टी२० बाबत आताच फारसा विचार करायला नको. मात्र, बीसीसीआयने याचा गांभीर्याने विचार करावा.”