Asia Cup 2025 Trophy Controversy Big Update: आशिया चषक २०२५ मधील ट्रॉफीचा वाद अद्याप कायम आहे. आशिया चषक २०२५ विजेत्या भारतीय संघाला अद्याप ट्रॉफी देण्यात आलेली नाही. भारतीय संघाने जेतेपद पटकावल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन निघून गेले आणि ती ट्रॉफी आता दुबईच्या कार्यालयात ठेवण्यात आली. यासंबंधित आता BCCIने मोहसीन नक्वींना सक्त ताकिद दिली आहे.

बीसीसीआयने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना पत्र लिहून या प्रकरणी इशारा दिल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयने आपल्या पत्रात म्हटलं आहे की जर मोहसिन नक्वी यांनी आशिया चषक ट्रॉफी भारताला दिली नाही तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.

इंडिया टुडेशी संवाद साधताना बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले की, जर मोहसीन नक्वी यांनी ट्रॉफीच्या मुद्द्यावर कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर बीसीसीआय टप्प्याटप्प्याने कारवाई करतील.

BCCI-ACC वाद तापला, बीसीसीआयने नक्वींना दिला अल्टीमेटम

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशियाई क्रिकेट परिषदचे (ACC) प्रमुख मोहसिन नक्वी यांना अधिकृत ईमेल पाठवत आशिया चषकाची ट्रॉफी भारताला देण्याची मागणी केली आहे. BCCI चे सचिव देवजीत सैकिया यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं की, ते सध्या नक्वी यांच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहेत. जर त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळालं नाही, तर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) अधिकृतरित्या नेण्यात येईल.

सैकिया यांनी स्पष्ट केलं की, BCCI हा संपूर्ण विषय टप्प्याटप्प्याने आणि अधिकृत प्रक्रियेने हाताळत आहे आणि ते हा मुद्दा सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहतील. सध्या आशिया चषकाची ट्रॉफी दुबईतील ACC कार्यालयात ठेवलेली आहे, कारण अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाने मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता.

भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (BCCI) आशियाई क्रिकेट परिषद (ACC) प्रमुख मोहसिन नक्वी यांना अधिकृत ईमेल पाठवत आशिया कपची ट्रॉफी भारताकडे परत देण्याची मागणी केली आहे.

BCCI चे सचिव देवजीत सैकिया यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, ते सध्या नक्वी यांच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहेत. जर त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळालं नाही, तर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) अधिकृतरित्या नेण्यात येईल. सैकिया यांनी स्पष्ट केलं की, BCCI हा संपूर्ण विषय टप्प्याटप्प्याने आणि अधिकृत प्रक्रियेने हाताळत आहे आणि ते हा मुद्दा सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहतील.

सध्या आशिया कपची ट्रॉफी दुबईतील ACC कार्यालयात ठेवलेली आहे, कारण अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाने मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता.

पाकिस्तानविरुद्ध आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात रोमांचक विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रिकेट परिषद (ACC) प्रमुख मोहसीन नक्वी यांच्या हस्ते पदकं आणि ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नक्वी यांनी भारतीय संघाला पारंपरिक विजेतेपद सोहळा न देण्याचा निर्णय घेतला आणि ACC अधिकाऱ्यांना ट्रॉफी त्वरित परत नेण्याचे आदेश दिले.

३० सप्टेंबर रोजी झालेल्या ACC बैठकीत, BCCI ने नक्वी यांच्या वर्तनाचा तीव्र निषेध केला आणि स्पष्ट केलं की आशिया चषक ही ACC ची मालमत्ता आहे. BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ठाम भूमिका घेत सांगितलं की, आशिया चषक २०२५ ची ट्रॉफी अधिकृतरीत्या भारतीय संघाला प्रदान केली पाहिजे आणि ती आशियाई क्रिकेट परिषदेकडे (ACC) तात्काळ सुपूर्त करण्यात यावी.

ACC सदस्य मंडळांची माफी मागूनही मोहसिन नक्वी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि ट्रॉफी भारतीय संघाला परत देण्यास नकार दिला. त्यांनी ठासून सांगितले की, भारतीय संघाला ट्रॉफी हवी असल्यास, कर्णधाराने वैयक्तिकरित्या ACC मुख्यालय येथे येऊन ती घ्यावी.

BCCI ने नक्वींची ही अट तत्काळ फेटाळली आणि म्हटलं की अंतिम सामन्यानंतर लगेचच दिली जाणारी ट्रॉफी घेण्यासाठी भारतीय कर्णधाराने दुबईला जाण्याचं काहीच कारण नाही.