Virat is spending a holiday with his wife Anushka in the Netherlands: भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिजचा दौऱ्यावर जाणार आहे. याआधी टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत सुट्टी घालवण्यासाठी नेदरलँडला पोहोचला आहे. गुरुवारी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हॉलंडमध्ये चाहत्यांसोबत फोटो काढताना दिसले. आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

यावेळी किंग कोहली पांढऱ्या हाफ टी-शर्टमध्ये दिसला. यासोबतच त्याने टोपी आणि चष्माही घातला होता. तर अनुष्का शर्मा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. दोघांनी चाहत्यांसोबत फोटोही काढले. हे दोन्ही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

खरंतर विराट आणि अनुष्का लंडनमध्ये कृष्णा दास यांच्या कीर्तनात सहभागी झाले होते. विराट आणि अनुष्काने यापूर्वीही अनेक धार्मिक स्थळांना भेट दिली आहे. कोहली आणि अनुष्काने मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकालचे दर्शन घेतले होते. त्यानंतर दोघेही वृंदावनला गेले होते. नुकतेच झालेल्या कीर्तनात सहभागी झाल्याचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओवर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हेही वाचा – VIDEO: व्हाईट हाऊसमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी अमेरिकन टीमचे केले कौतुक; म्हणाले, “बेसबॉलप्रमाणे क्रिकेटही…”

१२ जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात –

विशेष म्हणजे भारतीय संघ जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. येथे कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका १२ जुलैपासून सुरू होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या दौऱ्यात बीसीसीआय टीम इंडियातील अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊ शकते. आयपीएलनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमुळे खेळाडूंवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे त्याची काळजी घेतली जाण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोहली फायनलमध्ये अपयशी ठरला होता –

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात कोहलीने आपल्या फलंदाजीने चाहत्यांची निराशा केली होती. पहिल्या डावात तो दोन चौकारांच्या मदतीने १४ धावा काढून बाद झाला, तर दुसऱ्या डावात त्याने सात चौकारांच्या मदतीने ४९ धावा केल्या. मात्र, चौथ्या डावात धावांचा पाठलाग करताना कोहलीकडून मोठ्या आणि सामना जिंकवणाऱ्या खेळीची अपेक्षा होती, त्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला.