India Tour Of England: भारतीय वरिष्ठ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. यासह भारतीय १९ वर्षांखालील संघ देखील इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी आयपीएल २०२५ स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान आयुषच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय १९ वर्षांखालील संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील २ प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले असून, बदली खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे.
या दौऱ्यासाठी आयपीएल २०२५ स्पर्धा गाजवणाऱ्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला देखील स्थान देण्यात आले आहे. याआधी झालेल्या १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेसाठीही वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यात आले आहे. तो या संघातून खेळताना दिसेल. बंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अॅकेडमीत झालेल्या सराव शिबिरात वैभवने गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. दरम्यान २ खेळाडू असे आहेत ज्यांना दुखापतीमुळे संघाची साथ सोडावी लागणार आहे.
आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी १९ वर्षांखालील भारतीय संघात खिलन पटेल आणि आदित्य राणा यांना स्थान देण्यात आले होते. मात्र, या दोघांनाही दुखापतीमुळे संघाची साथ सोडावी लागणार आहे. या दोघांच्या जागी बदली खेळाडू म्हणून नमन पुष्पक आणि डी दिपेश यांना संधी देण्यात आली आहे. या दोघांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. आता २ खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर पडल्यानंतर, या दोघांचाही मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे. खिलन पटेलच्या उजव्या पायाला स्ट्रेस रिअॅक्शन झाल्यामुळे तर आदित्यला पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्यामुळे संघाची साथ सोडावी लागली आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी असा आहे भारताचा सुधारीत संघ:
आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मॉल्याराजनसिंग चावडा, राहुल कुमार, अभिषेक कुण्ढ (उपकर्णधार), हरवरण सिंग, आर.स. अंंबरीस, कनिष्क चौहान, प्रमोदकुमार, युवराज सिंग सिंग, डी. दीपेश, नम्र पुष्पक, हेनिल पाटेल, युधावना मोहम्मद, युधावना.
या दोन्ही संघांमध्ये २४ जूनपासून सराव सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर पाच वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. ही मालिका झाल्यानंतर, २ चार दिवसीय सामन्यांचा थरार रंगणार आहे.