‘गॉड ऑफ क्रिकेट’ अशी जगभरात ओळख असलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. आज तो ४९ वर्षांचा झाला आहे. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सचिनने आपल्या २४ वर्षांच्या कार्यकाळात चाहत्यांचे मनोरंजन तर केलेच पण त्याचबरोबर आपल्या नावावर अनेक विक्रमांची नोंद देखील केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिनने ६६४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये ३४ हजार ३५७ रन्स बनवून विक्रम केला आहे. यादरम्यान त्याने १०० शतक आणि १६४ अर्धशतक झळकावली. तसेच, गोलंदाजीतही त्याने आपली जादू दाखवत २०१ विकेट्स घेतले. सचिन तेंडुलकर म्हणजे भारतातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. परंतु खूप कमी लोकांना माहित असेल की एकदा सचिनला पाकिस्तान संघासाठीही मैदानात उतरावे लागले होते, तेही भारतीय संघाविरुद्ध.

UPI Fraud : सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी पाच सोप्या स्टेप्स; आजच करा फॉलो

१९८७ सालची गोष्ट आहे, जेव्हा सचिन तेंडुलकरचे आंतरराष्ट्रीय पदार्पणही झाले नव्हते. त्या वर्षी पाकिस्तानी संघ पाच कसोटी सामने आणि सहा एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारतात आला होता. मालिका सुरू होण्यापूर्वी, २० जानेवारी १९८७ रोजी, मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात ४०-४० षटकांचा एक प्रदर्शनीय सामना खेळला गेला.

त्या सामन्यात जावेद मियांदाद आणि अब्दुल कादिर जेवणाच्या वेळी मैदानाबाहेर गेले. अशा स्थितीत भारतीय डावादरम्यान १३ वर्षीय सचिन तेंडुलकर पाकिस्तान संघाचा पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरला. त्याला पाकिस्तानचा कर्णधार इमरान खानने वाइड लाँग ऑनवर पोस्ट केले होते. सचिनने त्याच्या ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे. सचिनने आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, ‘मी पाकिस्तानी संघासाठी एकदा मैदानात उतरलो होतो, हे इमरान खानला आठवेल की नाही माहीत नाही’.

किली पॉलच्या कुऱ्हाडीसोबच्या अ‍ॅक्शन सीनवर नेटकरी झाले फिदा! बघा Viral Video

मास्टर ब्लास्टरने असेही लिहिले की क्षेत्ररक्षणादरम्यान सुमारे १५ मीटर धावताना तो कपिल देवची कॅच पकडण्याच्या अगदी जवळ आला होता. काही वर्षांनंतर सचिन पाकिस्तानविरुद्धच कराची कसोटी सामन्यात टीम इंडियासाठी पदार्पण करण्यात यशस्वी झाला. या पदार्पणानंतर सचिनने कधीही मागे वळून पाहिले नाही.

त्या प्रदर्शनीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने १८९ धावा केल्या. प्रत्युत्तरात रवी शास्त्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ४ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठले. यावेळी मोहम्मद अझरुद्दीनने ८० आणि रॉजर बिन्नीने ६३ धावांचे योगदान दिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birthday special why did sachin tendulkar played for pakistan find out pvp
First published on: 24-04-2022 at 11:10 IST