नवी दिल्ली : कार अपघातात गंभीर जखमी झालेला यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून, त्याला उपचारासाठी अन्यत्र हलवायचे की नाही याचा अजून निर्णय झाला नसल्याचे पंतच्या कुटुंबीयांनी सांगितले.

डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात पंतवर उपचार सुरू असून, आई सरोज पंत आणि लंडनहून तातडीने आलेली बहीण साक्षी त्याच्या जवळ आहेत. दिल्ली संघातील खेळाडू नितीश राणा, अभिनेते अनिल कपूर, अनुपम खेर यांच्यासह दिल्ली क्रिकेट संघटनेचे संचालक श्याम शर्मा यांनी शनिवारी रुग्णालयात पंतची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.

आणखी वाचा – ऋषभ पंतच्या उपचारांबाबत BCCI नं दिली महत्त्वाची माहिती; ‘गरज पडल्यास…’

पंतवर योग्य पद्धतीने उपचार सुरू असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळही रुग्णालयाच्या सतत संपर्कात आहे. सध्या तरी पंतवर येथेच उपचार होणार असल्याचे श्याम शर्मा यांनी सांगितले. पंतच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा असून, शुक्रवारीच त्याच्या कपाळावर प्लॅस्टिर सर्जरी करण्यात आली आहे. सध्या तरी त्याला अन्यत्र हलविण्याचा विचार नाही, असे पंतवर उपचार करणारे डॉक्टर उमेश कुमार यांनी सांगितले.

नक्की पाहा – Video: पंतच्या अपघाताने इशान किशनला धक्का! १ शब्द बोलला अन्..; शेवटी फॅन म्हणाले, “भाई प्लीज..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंत ऑस्ट्रेलियाच्या मालिकेला मुकणार?

कार अपघातात जखमी झालेला भारताचा यष्टिरक्षक ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी  मालिकेला मुकणार हे निश्चित झाले आहे. पंतच्या दुखापतीच्या नव्या चाचणीनंतर पंतची घोटा आणि गुडघ्याची दुखापत गंभीर असून, स्नायू फाटले आहेत. त्यामुळे पंतला किमान सहा महिने खेळता येणार नाही. अशा वेळी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी नव्याने येणाऱ्या निवड समितीसमोर ईशान किशन, भारत-अ संघाचा उपेंद्र यादव आणि केएस भरत या तीन यष्टिरक्षकांचा पर्याय असेल. ही मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.