मोनाको : आगामी पॉरिस ऑलिम्पिक स्पर्धेपासून जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेने ‘ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड’ प्रकारातील प्रत्येक सुवर्णपदक-विजेत्या खेळाडूला रोख ५० हजार डॉलर (साधारण ४१ लाख ६० हजार ०७५ रुपये) पारितोषिक देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकविजेत्यास रोख पारितोषिक देणारी जागतिक अ‍ॅथलेटिक्स ही पहिली संघटना ठरली आहे.

‘ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड’च्या शिखर संघटनेने यासाठी २४ लाख डॉलर (अंदाजे २० कोटी रुपये) इतकी रक्कम बाजूला ठेवली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील ४८ प्रकारातील प्रत्येक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यास २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकपासून सुरुवात होईल. रिले शर्यतीसाठी ५० हजार डॉलरचे पारितोषिक चार जणांत वाटून देण्यात येईल. 

हेही वाचा >>>RR vs GT : गुजरातने राजस्थानचा विजयरथ रोखला, राशिद खानच्या खेळीच्या जोरावर ३ विकेट्सनी नोंदवला शानदार विजय

आधुनिक ऑलिम्पिकची उत्पत्ती ही हौशी क्रीडा स्पर्धा म्हणून झाली आणि स्पर्धेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती कधीच रोख पारितोषिक देत नाही. अनेक पदकविजेत्यांना त्यांच्या देशाकडून किंवा पुरस्कर्त्यांकडून रोख पारितोषिके दिली जातात.