क्रिकेट सामन्यादरम्यान सर्वांचे अधिक्तर लक्ष गोलंदाज आणि फलंदाजाकडे असते. फार कमी वेळा क्षेत्ररक्षणाकडे लक्ष जाते. पण क्षेत्ररक्षणादरम्यान खेळाडूंनी असे काही झेल पकडल्याचे अनेकदा दिसून आले आहे, ज्यामुळे इतिहास बनला आहे. असा एक झेल महिला बिग बॅश लीग सामन्यात घेण्यात आला आहे.

जेव्हा जेव्हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा विषय निघतो, तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी रोड्स आणि भारताचा रवींद्र जडेजा, सुरेश रैना यांच्या नावाचा उलेल्ख पाहिला मिळतो. हे सर्वजण त्यांच्या उत्कृष्ट झेल आणि क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जातात. आता या यादीमध्ये एका महिला क्रिकेटपटूचे नाव जोडले गेले आहे. जिचे नाव चार्ली नॉट आहे.

सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला बिग बॅश लीग २०२२ मध्ये ब्रिस्बेन हीटची खेळाडू चार्ली नॉटने असा झेल पकडला ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नॉटने असा झेल पकडला आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या महिला क्रिकेटरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अॅडलेड स्ट्रायकर्सच्या डावातील १४व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अमेला केरच्या चेंडूवर नॉटने लॉरा वॉलवॉर्ट (४६) चा हा शानदार झेल घेतला.

अॅडलेड स्ट्रायकर्सने ब्रिस्बेन हीटचा 31 धावांनी पराभव केला –

महिला बिग बॅश लीग सामन्यात ज्या दरम्यान हा झेल घेण्यात आला, लीगचा १९ वा सामना ब्रिस्बेन हीट आणि अॅडलेड स्ट्रायकर्स यांच्यात अॅलन बॉर्डर फील्ड, ब्रिस्बेन येथे झाला. या सामन्यात ब्रिस्बेन हीटने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – T20 World Cup 2022: हा घ्या विराटचा फॉर्म गवसल्याचा पुरावा; २०१९ नंतर पहिल्यांदाच…