Cheteshwar Pujara 100th Test: आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे सुरू होत आहे. आज चेतेश्वर पुजारा या मैदानावर आपली १००वी कसोटी खेळत आहे, त्यामुळे बीसीसीआयने भव्य सेलिब्रेशनचे नियोजन केले आहे. भारतीय क्रिकेटपटूची आपल्या देशासोबत १३ वर्षांची यशस्वी कारकीर्द आहे. अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी DDCA चेतेश्वर पुजाराचा सत्कार करत आहे. चेतेश्वर पुजारा आपल्या कसोटी कारकिर्दीत १००व्यांदा मैदानात उतरणारा १३वा भारतीय ठरला आहे. यावेळी त्यांचे वडील, पत्नी पूजा आणि मुलगी उपस्थित होते.

सुनील गावसकर यांनी चेतेश्वरला त्याच्या १००व्या कसोटी सामन्यात कॅप देऊन त्याचा गौरव केला आहे. यावेळी त्यांचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत होते. यावेळी पुजाराचे वडील, पत्नी पूजा आणि त्यांची मुलगी देखील मैदानावर उपस्थित होते. आपल्या १००व्या कसोटीवर पुजाराने भावनिक भाषण केले आणि त्याचे कुटुंब, चाहते, त्याची टीम आणि बीसीसीआयचे आभार मानले.

हेही वाचा: BCCI Chief Selector: चेतन शर्माच्या स्टिंग ऑपरेशनवर पाकिस्तानी दिग्गज संतापला, म्हणाला “धोनीला मुख्य निवडकर्ता करा”

पुजारा म्हणाला, “माझा विश्वास आहे की कसोटी क्रिकेट हा सर्वोत्तम फॉरमॅट आहे. ते तुमच्या स्वभावाची परीक्षा घेते, तुमच्या चारित्र्याची परीक्षा घेते.” सुनील गावसकर यांच्याकडून कॅप स्वीकारल्यावर पुजारा पुढे म्हणाला, “तुमच्याकडून ही कॅप स्वीकारणे हा खूप मोठा सन्मान आहे, तुमच्यासारख्या दिग्गजांनी मला प्रेरणा दिली. मला लहानपणी भारताकडून खेळायचे होते, पण मी १०० कसोटी सामने खेळू शकेन असे कधीच वाटले नव्हते. माझ्यासाठी कसोटी क्रिकेट हे अंतिम स्वरूप आहे, ते जीवनाप्रमाणेच तुम्हाला आव्हान देते. मी तुम्हा सर्व तरुणांना भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहित करतो. मी माझी पत्नी, माझे कुटुंब, बीसीसीआयमधील प्रत्येकाचे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी मला या प्रवासात साथ दिली.”

सुनील गावसकरांनी पुजाराचे केले कौतुक

भारताच्या माजी कर्णधाराने पुजाराचे कौतुक करताना म्हटले की “आपले शरीर सुदृढ ठेवल्याबद्दल तुझे अभिनंदन! त्यानंतर तुझ्या ज्यापद्धतीने फलंदाजी करतोस त्यामुळे भारताला अधिक स्थिरता येते अशी त्यांनी प्रशंसा केली.” पुढे गावसकर म्हणाले की. “जेव्हा तो फलंदाजीसाठी बाहेर गेला तेव्हा तो भारतीय ध्वज सोबत घेऊन गेला आणि त्याने तो नेहमी उंचावत ठेवला अशीच अजून तुझ्याकडून चांगल्या खेळींची अपेक्षा संपूर्ण देशाला आहे, तुला मनापासून शुभेच्छा!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध केले होते पदार्पण

२०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगळुरू येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत, पुजाराने विजयी प्रयत्नात ४ आणि ७२ धावांची खेळी करून पदार्पण केले. राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर पुजाराने क्रमांक ३ वर पदभार स्वीकारला आणि प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये मधल्या फळीत भारताचा मुख्य आधार म्हणून स्वत:ला स्थापित केले.