बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनी कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारानं कसोटी सामन्यात सहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. सहा हजार धावा पूर्ण कराना पुजारा भारताला ११ वा फलंदाज ठरला आहे. तिसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी नॅथन लायनच्या चेंडूवर एक धाव घेत पुजारानं सहा हजार धावा पूर्ण केल्या आहेत. सिडनी कसोटी सामन्यात पुजारानं निर्णायक क्षणी ७७ धावांची खेळी केली.
चेतेश्वर पुजारा आपल्या कारकिर्दीतीचा ८० वा सामना खेळत आहे. पुजारानं १३४ व्या डावांत ४८ च्या सरासरीनं सहा हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. यादरम्यान पुजारानं १८ शतकं आणि २७ अर्धशतकं झळकावली आहेत. २०६ ही पुजाराची सर्वोच्च धावसंख्या आहे.
आणखी वाचा- गरज पडल्यास इंजेक्शन घेऊन जाडेजा उतरणार मैदानात
१० वर्षांपूर्वी बंगळुरुमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात पुजारानं कसोटी सामन्यात पदार्पण केलं होतं. त्यानंतर १८ व्या डावात पुजारानं एक हजार धावांचा टप्पा पार केला होता. २००० धावांसाठी पुजाराला ४६ डाव लागले होते. तर ३००० धावांसाठी ६७ डाव, ४००० धावांसाठी ८४ डाव, ५००० धावांसाठी १०८ डाव आणि सहा हजार धावांसाठी १३४ डाव लागले आहेत.
Cheteshwar Pujara has become the 11th Indian batsman to reach 6000 runs in Test cricket!
What a fine player he has been
He is also closing in on a fifty in the #AUSvIND Test. pic.twitter.com/MMApa5sIs9
— ICC (@ICC) January 11, 2021
आणखी वाचा- ऑस्ट्रेलिायच्या कर्णधाराला आयसीसीनं ठोठावला दंड
पुजाराशिवाय सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर, लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, सौरव गांगुली, दिलीप वेंगसकर, मोहम्मद अजहरुद्दीन आणि गुंडप्पा विश्वनाथ यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा पार केला आहे.