IND vs ENG 1st Test Updates in Marathi: भारत वि. इंग्लंड पहिल्या कसोटीत तर चेतेश्वर पुजाराने सर्वाचं लक्ष वेधलं आहे. पुजाराने मैदानाच्या बाहेरूनच इंग्लंडच्या खेळाडूला धक्का दिला आहे. चेतेश्वर पुजाराला या मालिकेसाठी कॉमेंटेटर म्हणून या दौऱ्यावर गेला आहे. यादरम्यान, पुजाराने असं काही केलं की सर्वच जण त्याचं कौतुक करत आहेत. खरंतर, पुजाराने मायकल वॉ ची अशा प्रकारे बोलती बंद केली आहे की सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू आहे.
मायकेल वॉ ला अनेकदा विचित्र ट्विट करण्याची सवय असते. वॉ इतर संघांच्या मालिकांबाबत आपलं मत मांडतात. तर कोणता संघ जिंकू शकतो याची भविष्यवाणी देखील करतात. याशिवाय सामन्यात घडणाऱ्या घटनांबाबत वक्तव्य ते थेट एखाद्याल ट्रोल करणंदेखील सुरू असत. पण पुजाराच्या या कृतीने मात्र मायकेल वॉ यांना चांगलाच धडा शिकवला आहे.
२०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत मालिकेदरम्यान मायकेल वॉ यांनी असंच एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी दावा केला होता की भारत ०-४ असा पराभूत होईल. भारतीय संघाने मात्र या मालिकेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत ऐतिहासिक विजय नोंदवला होता. टीम इंडियाने वॉ यांचं भाकीत खोटं ठरवलं आणि मालिका २-१ अशी जिंकली.
आता भारताच्या इंग्लंडविरूद्ध मालिकेदरम्यान पुजाराने वॉ यांचे ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वीचे ट्विट फ्रेम केलं आणि लीड्स कसोटीपूर्वी स्टुडिओमध्ये ही फ्रेम घेऊन पोहोचला. इतकंच नव्हे तर पुजाराने त्या फ्रेमवर वॉ यांचा ऑटोग्राफ घेतला. जेव्हा चेतेश्वर पुजाराने वॉ यांचा ऑटोग्राफ घेतला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं पण खरंतर त्यांचा चेहरा फिका पडला होता.
समोर घडत असलेला प्रकार पाहून स्टुडिओमध्ये उपस्थित असलेले सुनील गावस्कर आणि हर्षा भोगलेही हसत होते. या क्षणाचा फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मायकेल वॉ पुजाराने फ्रेम केलेल्या ट्विटवर सही करत आहेत. तर पुजारा आणि गावस्कर मात्र हसत आहेत. वॉ यांनी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वीही भाकित केलं आहे. त्यांच्या मते, इंग्लंड ही मालिका जिंकेल. आता भारतीय चाहते शुबमन गिल आणि संघ त्यांचं भाकित चुकीचं सिद्ध करतील या प्रतिक्षेत आहेत.
भारताने पहिल्या कसोटीला चांगली सुरूवात केली पण लंच ब्रेकच्या काही मिनिट आधी भारताने झटपट दोन विकेट्स गमावले. सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी ९१ धावांची भागीदारी रचत चांगली सुरूवात केली. पण ब्रायडन कार्सने राहुलला झेलबाद करवत पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. राहुल यासह ८ चौकार लगावत ४२ धावा करून बाद झाला. तर पदार्पणवीर साई सुदर्शन स्टोक्सच्या गोलंदाजीवर खातंही न उघडता माघारी परतला. यासह लंच ब्रेकपूर्वी भारताने २ विकेट्स गमावत ९२ धावा केल्या आहेत.