पात्रता फेरीत पहिले दोन्ही सामने जिंकलेला सनरायजर्स हैदराबादचा संघ मंगळवारी चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या मुख्य फेरीतील पहिल्या सामन्यात उतरेल तो विजयाच्या सूर्योदयासाठीच. मंगळवारी त्रिनिदाद आणि टोबॅगो संघाशी हैदराबादचा पहिला सामना होणार आहे.
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली हैदराबादचा संघ जेतेपदाला गवसणी घालतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. हैदराबादच्या फलंदाजीचा शिखर हा पाया आहे, त्याचबरोबर त्यांची मदार कॅमेरुन व्हाइट, जे.पी.डय़ुमिनी आणि पार्थिव पटेल यांच्यावर असेल. तर गोलंदाजीमध्ये डेल स्टेन हे त्यांचे प्रमुख अस्त्र असून भारताच्या अमित मिश्रा आणि इशांत शर्मा यांची प्रभावी साथ स्टेनला मिळू शकेल. त्याचबरोबर डॅरेन सॅमीसारखा अनुभवी गोलंदाजही त्यांच्याकडे आहे.
त्रिनिदादच्या संघाची मुख्यत्वेकरून धुरा गोलंदाजीवर असेल. कारण सुनील नरीन आणि रवी रामपॉल यांच्यासारखे अनुभवी गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. फलंदाजीमध्ये डॅरेन ब्राव्होसारखा दमदार फलंदाज आहे. त्याचबरोबर कर्णधार दिनेश रामदिनकडूनही संघाला मोठय़ा अपेक्षा असतील.
संग्रहित लेख, दिनांक 24th Sep 2013 रोजी प्रकाशित
विजयाच्या सूर्योदयासाठी सनरायजर्स सज्ज
पात्रता फेरीत पहिले दोन्ही सामने जिंकलेला सनरायजर्स हैदराबादचा संघ मंगळवारी चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या मुख्य फेरीतील पहिल्या सामन्यात उतरेल तो विजयाच्या सूर्योदयासाठीच.

First published on: 24-09-2013 at 05:19 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clt20 preview in search of runs trinidad tobago take on sunrisers hyderabad