टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया बुधवारी युएईतूनच थेट ऑस्ट्रेलियात रवाना झाली. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. आऊटलूकने दिलेल्या वृत्तानुसार टीम इंडिया या दौऱ्यात वन डे आणि टी २० मालिका रेट्रो जर्सीमध्ये खेळणार आहे. टीम इंडियाच्या सध्याच्या जर्सीचा रंग हा निळा आहे. पण ७० ते ८० च्या दशकात टीम इंडियाची गाजलेली रेट्रो जर्सी चाहत्यांना पुन्हा मैदानात पहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या नव्या जर्सीवर टीम इंडियाचा नवीन किट स्पॉन्सर MPL (Mobile Premier League) चा लोगो आहे. काही दिवसांपूर्वीच BCCI ने टीम इंडियाच्या किट स्पॉन्सरचे हक्क MPL ला दिले आहेत. ८०च्या दशकातील जर्सीमध्ये विराट कसा दिसेल? याबद्दलची चर्चा सोशल मीडियावर रंगल्याचे दिसत आहे.

भारतीय संघाप्रमाणेच ऑस्ट्रेलियाचा संघही या दौऱ्यावर खास डिजाईन केलेली जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.

टीम इंडिया कसोटी संघ– विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ– टीम पेन (कर्णधार व यष्टीरक्षक), सिन अबॉट, जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरुन ग्रिन, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लॉयन, मायकल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्सकी, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन, मॅथ्य वेड, डेव्हिड वॉर्नर

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी – १७ ते २१ डिसेंबर – अ‍ॅडलेड (दिवस-रात्र)
दुसरी कसोटी – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
तिसरी कसोटी – ७ ते ११ जानेवारी २०२१ – सिडनी
चौथी कसोटी – १५ ते १९ जानेवारी – गॅबा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket fans excited for rohit sharma virat kohli in team india retro kit australia tour ind vs aus vjb
First published on: 12-11-2020 at 16:19 IST