Kasi Viswanathan’s revelations about Ajinkya Rahane: आयपीएल २०२३ मध्ये, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला पाचव्यांदा या लीगचा चॅम्पियन बनण्याचा मान मिळाला. या हंगामात धोनीने टीम इंडियाचा वरिष्ठ फलंदाज अजिंक्य रहाणेला दिलेली जबाबदारी त्याने योग्य पद्धतीने पार पाडली. रहाणेच्या आयपीएल कामगिरीमुळे त्याला कसोटी संघातही पुनरागमन करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर अजिंक्य रहाणेही मिळालेल्या संधी सोने केले. अजिंक्य रहाणेचे सीएसके संघात कशी निवड झाली, याबाबत सीएसके सीईओ काशी विश्वनाथन यांनी खुलासा केला.

अजिंक्य रहाणे गेल्या अनेक वर्षांपासून भारतासाठी एकदिवसीय आणि टी-२० सामने खेळत नाही. तसेच कसोटी संघात त्याचे पुनरागमनही जवळपास दीड वर्षांनी झाले, परंतु त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि आपल्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. डब्ल्यूटीसी सामन्यात रहाणेने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. तत्पुर्वी सीएसके कॅम्पमध्ये रहाणेची एंट्री झाली होती. त्यामागे संघाचा कर्णधार एमएस धोनीचा मोठा हात होता. ज्याने फ्रँचायझीला खात्री दिली होती की, रहाणे संघासाठी फायदेशीर ठरू शकतो.

आता या टीमचे सीईओ ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना कासी विश्वनाथन यांनी धोनीने फ्रँचायझीला रहाणेबद्दल काय सांगितले होते, ते सांगितले. काशी म्हणाले की, “अजिंक्य रहाणेबद्दल धोनी म्हणाला होती की, रहाणेकडे असलेल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा आपल्याला फायदा होईल. जेव्हा आम्ही त्याला संधी दिली, तेव्हा त्याने चांगली कामगिरी करेल. धोनीचा रहाणेवर पूर्ण विश्वास होता आणि रहाणेनेही धोनीचा तो विश्वास सार्थ ठरवला ठेवला. त्याने या हंगामात संघासाठी खूप काही केले आहे.”

हेही वाचा – ODI WC 2023 Qualifiers: हरारे स्पोर्ट्स क्लबला भीषण आग, आयसीसीने सामन्यांच्या आयोजनाबाबत घेतला ‘हा’ निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएल २०२३ मध्ये रहाणेला सीएसको संघाने त्याच्या ५० लाखांच्या मूळ किंमतीवर खरेदी केले होते. रहाणेला या मोसमात धोनीने तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली आणि त्याने कामगिरीही केली. रहाणेने या संघात सीएसकेसाठी १४ सामन्यांच्या ११ डावात ३२६ धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट १७२.४९ होता. रहाणेने या मोसमात दोन अर्धशतके झळकावली. तसेच नाबाद ७१ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.