Harmanpreet Kaur in CWG 2022 : २०२२ बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये महिला टी २० क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. यातील पहिल्याच सामन्यात भारतासमोर जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारताचा तीन गडी राखून पराभव केला. असे असले तरी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वांची मने जिंकली आहेत.

इंग्लंडमधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (५२) अर्धशतकाच्या जोरावर भारताने कांगारूंसमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कौरने ३४ चेंडूत ५२ धावा फटकावल्या. यामध्ये आठ चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. हरमनप्रीतचे अर्धशतक ऐतिहासिक ठरले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुठल्याही महिला क्रिकेटपटूचे हे पहिलेच अर्धशतक ठरले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात हरमनप्रीत व्यतिरिक्त शफाली वर्माने धडाकेबाज ४८ धावा फटकावल्या. भारताच्यावतीने रेणूका सिंगने शानदार गोलंदाजी करून चार बळी मिळवले. मात्र, तरीही भारताला विजय मिळवता आला नाही. भारताचा पुढील सामना रविवारी (३१ जुलै) पाकिस्तानसोबत होणार आहे.