भारताचा जिगरबाज खेळाडू विराट कोहलीच्या मैदानातील अॅटीट्यूडवर अनेक तरूणी फिदा आहेत. जगभरात विराट कोहलीचे अनेक चाहते असले तरी तरूणींमध्ये विराट कोहली विशेष लोकप्रिय आहे. पण शुक्रवारी आयसीसी विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यानंतर विराटच्या ‘फिमेल फॉलोअर्स’च्या लिस्टमध्ये एका खास ललनेचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे ती क्रिकेटची उत्तम जाणकार आहे. आयसीसी विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यातील विराटच्या जिगरबाज खेळीनंतर इंग्लडच्या महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू डॅनियल वेट हिने ट्विटरवरून विराटसमोर लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

या सामन्यानंतर डॅनियल वेट हिने ट्विटरवर ‘कोहली माझ्याशी लग्न कर!’ असे सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर लगेचच डॅनियल वेटच्या या ट्विटरवर ” विराट कोहली आधीच अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत बुक आहे.” अशी प्रतिक्रिया अन्य एका ट्विटरधारकाकडून देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.



मात्र, डॅनियल वेटने ‘विराट कोणासोबत एन्गेज्ड नाही.’ असे आत्मविश्वासपूर्ण उत्तर दिले आहे.