इंग्लंडच्या फुटबॉल संघाचा माजी कर्णधार आणि जगभरातल्या फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला डेव्हिड बेकहॅमच्या गाडीला अपघात झाल्याचे वृत्त आहे. उत्तर लंडनमधील हर्टफोर्डशायर येथील अर्सेनल प्रशिक्षण केंद्राच्या मैदानाबाहेर डेव्हिड बेकहॅम आणि त्याचा मुलगा ब्रुकलेन प्रवास करत असलेल्या गाडीला अपघात झाला. ‘द टेलिग्राफ’मध्ये आलेल्या वृत्तानुसार, डेव्हिड आपल्या १५ वर्षांच्या मुलाला प्रशिक्षण केंद्रावरून घेऊन ‘ऑडी आरएस-६’ गाडीने जात असताना, त्याची गाडी दुसऱ्या एका गाडीवर आदळल्याने हा अपघात झाला. सुदैवाने गाडीतील एअर बॅगमुळे कोणालाही मोठ्याप्रमाणावर दुखापत झाली नसल्याचे समजते.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Dec 2014 रोजी प्रकाशित
डेव्हिड बेकहॅमच्या गाडीला अपघात
इंग्लंडच्या फुटबॉल संघाचा माजी कर्णधार आणि जगभरातल्या फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला डेव्हिड बेकहॅमच्या गाडीला अपघात...

First published on: 02-12-2014 at 05:54 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: David beckham car crash