टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर सर्वाधिक चर्चेत असणारं नाव म्हणजे, डेव्हिड वॉर्नर! तो आला… त्याने पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काही… या अशा मोजक्या शब्दांमध्ये वर्णन करता येईल अशी कामगिरी मागील काही आठवड्यांमध्ये टी-२० विश्वचषक विजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने केलीय. याच भन्नाट कामगिरीसाठी त्याला २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमधील मालिकावीर पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. मात्र त्याच्या या सकारात्मक कामगिरीबरोबरच यंदाच्या इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये त्याला देण्यात आलेली वागणूक जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरलीय. तरी यासंदर्भात पहिल्यांदाच वॉर्नर ज्या सनरायजर्स हैदराबाद संघाचा सदस्य होता त्यांच्याकडून वॉर्नरला वगळण्यामागील आणि कर्णधार पद काढून घेण्यामागील कारणांवर भाष्य करण्यात आलं असून या निर्णयामध्ये क्रिकेटशी संबंधित काहीच कारण नसल्याचं म्हटलंय.

नक्की पाहा >> संपूर्ण जग कौतुक करत असताना वॉर्नर मात्र विल्यमसनच्या कामगिरीवर झाला फिदा; Insta Story चा Screenshot व्हायरल

सनरायझर्स हैदराबाद संघासाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहणाऱ्या ब्रॅड हादीन यांनी क्रिकेटसंदर्भातील कारणांमुळे डेव्हिड वॉर्नरला संघातून काढून टाकण्यात आलं नव्हतं असा दावा केला आहे. वॉर्नरला संघातून काढण्यात आलं तेव्हा तो चांगल्या फॉर्मममध्ये नव्हता, चांगला खेळत नव्हता असंही नव्हतं. सरावादरम्यानही वॉर्नर उत्तम फटकेबाजी करत होता. मात्र परिस्थिती आमच्या हाताबाहेर होती, असं हादीन यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर ‘तो’ म्हणाला, “३३५ दिवस”; पण या ट्विटचा अर्थ काय?

“वॉर्नर सनरायझर्स हैदराबाद संघामध्ये खेळत नव्हता यामागे काही क्रिकेटशी संबंधित कारण नव्हतं, हे मी तुम्हाला सांगू शकतो. वॉर्नरबद्दल एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायला हवी की तो फॉर्ममध्ये नव्हता अशी गोष्ट नव्हती. मात्र त्याला सामन्यांचा सराव करणं जमत नव्हतं. त्यांच्या क्रिकेटमध्ये फार मोठा गॅप पडला होता. तो बांगलादेश तसेच वेस्ट इंडिज दौऱ्यावर संघासोबत गेला नव्हता. मात्र तो फार चांगल्या मनस्थितीमध्यो होता. तो चांगली फटकेबाजी करत होता. पण परिस्थिती आमच्या हाताबाहेर गेली. अगदी त्याला प्रशिक्ष देणाऱ्यांच्याही,” असं हादीन यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं आहे.

नक्की वाचा >> T20 World Cup: शोएब अख्तर म्हणतो, “वॉर्नरला मालिकावीर पुरस्कार देण्याचा निर्णय अन्यायकारक, हा पुरस्कार तर…”

सामन्यादरम्यान वॉर्नरने थोडा वेळ मैदानात घालवणं गरजेचं होतं. त्याने हळूहळू चांगली फटकेबाजी करायला सुरुवातही केली होती. मात्र नंतर परिस्थिती हाताबाहेर गेली, असं सांगत सह प्रशिक्षकांनी ‘परिस्थिती हाताबाहेर गेली’ म्हणजे नेमकं काय घडलं यावर अधिक प्रकाश टाकण्याचं टाळलं. मात्र त्याचवेळी वॉर्नरला संघाबाहेर काढण्यामागे क्रिकेटशी संबंधित कारण नसल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

नक्की वाचा >> UAE वरुन परतणाऱ्या हार्दिक पांड्याला कस्टमचा दणका; मुंबई विमानतळावर जप्त करण्यात आली पाच कोटींची घड्याळं

यापूर्वी वॉर्नरला संघाबाहेर बसवण्यामागे आर्थिक गणितं किंवा कॉन्ट्रॅक्टसंदर्भातील कारण असल्याच्या शक्यता काहींनी व्यक्त केल्या होत्या. मात्र संघ व्यवस्थापनाकडून यासंदर्भात अद्याप कधीच स्पष्टपणे खुलासा करण्यात आलेला नाहीय.