DC vs GG Highlights in Marathi: दिल्ली कॅपिटल्सचा संघाने गुजरात जायंट्स संघावर एकतर्फी ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. दिल्लीच्या मारिजन कापने भेदक गोलंदाजी करत गुजरात संघाचं कंबरड मोडलं. मारिजन काप टी-२० सामन्यात २ विकेट मेडन षटक टाकत गुजरात संघाला धावा करण्याची संधी दिली नाही. यासह गुजरातने दिल्लीला अवघ्या १२७ धावांचे आव्हान दिले. तर दिल्लीने १६व्या षटकात १३१ धावा करत शानदार विजय मिळवला. या विजयासह दिल्लीचा संघ WPL २०२५ च्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

१२८ धावांच्या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खास झाली नाही. कर्णधार मेग लॅनिंगने १३ चेंडूत ३ धावा केल्या. ती बाद झाल्यानंतर शफाली वर्मा आणि जेस जोनासेन यांनी डावाची धुरा सांभाळली. दोघांनी मिळून ७४ धावांची भागीदारी केली. शेफाली वर्माने २७ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ४४ धावांची खेळी केली. शेफाली वर्माने मेग लॅनिंगच्या विकेटनंतर संघाचा डाव सावरला तर जोनासनबरोबर उत्कृष्ट भागीदारी रचली.

तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेस जोनासेनने शानदार अर्धशतक झळकावले. जोनासनने ३२ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६१ धावांची मॅचविनिंग खेळी केली. मात्र, जेमिमाह रॉड्रिग्ज (५) आणि सदरलँड (१) लवकर बाद झाले. विकेट्स गमावल्यानंतर जेस जोनासेन आणि मारिझान कॅपने संघाला विजयाकडे नेले. गुजरातकडून काश्वी गौतमने २ विकेट्स तर अॅश्ले गार्डनर आणि तनुजा कंवर यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

महिला प्रीमियर लीग सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने शानदार गोलंदाजी करत गुजरात जायंट्सला २० षटकांत ९ गडी गमावून १२८ धावांवर रोखले. नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघातील वेगवान गोलंदाजी आक्रमणाने हा निर्णय अगदी योग्य असल्याचे सिद्ध केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरातकडून डिएंड्रा डोटिनने २६ धावा, तनुजा कन्वरने १६ धावा तर भारती फुलमाली हिने ४० धावांची खेळी केली. याशिवाय संघाचे सर्व खेळाडू स्वस्तात बाद झाले. दिल्लीकडून शिखा पांडेने २ विकेट्स, मारिजन कापने २ विकेट्स, एनाबेल सदरलँडने २ विकेट्स घेतले. तर तितास साधू आणि जोनासनने प्रत्येकी १ विकेट घेतली.