इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत १४३ धावांची खेळी करणारी महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीत चार गुणांची झेप घेत पाचवे स्थान मिळवले आहे. हरमनप्रीतच्या भारतीय संघाने इंग्लंडला त्यांच्याच भूमीत ३-० असा व्हाईटवॉश देणाचा पराक्रम प्रथमच केला. या खेळीसह हरमनप्रीतने अनेक विक्रम मोडले आणि आता आयसीसी नेही तिच्या या खेळीची दखल घेत आज जाहीर केलेल्या महिलांच्या एकदिवसीय खेळाडू क्रमवारीत हरमनप्रीतचे प्रगती झाली आहे. तिने चार स्थानांच्या सुधारणेसह पाचवा क्रमांक पटकावला. सलामीवीर स्मृती मंधाना व दीप्ती शर्मा यांनीही ताज्या क्रमावारीत आगेकूच केली आहे.

मंधानाने इंग्लंड दौऱ्यावर दोन सामन्यात अनुक्रमे ४० व ५० धावा केल्या त्याच्या जोरावर ती एक स्थानाच्या सुधारणेसह सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे. टी२० च्या मध्ये फलंदाजांमध्ये मंधाना दुसऱ्या क्रमांकावर आहे. लॉर्डसवर झालेल्या अखेरच्या सामन्यात दीप्ती शर्माने नाबाद ६८ धावांची खेळी करून विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. ती ८ स्थान वर सरकली असून २४ व्या क्रमांकावर पोहोचली आहे. पूजा वस्त्राकर चार स्थान वर सरकून ४९व्या आणि हर्लिन देओल ८१व्या क्रमांकावर आली आहे. भारताची गोलंदाज रेणुका सिंग ७०व्या क्रमांकावरून ३५व्या क्रमांकावर आली आहे.

अखेरच्या सामन्यानंतर झुलन गोस्वामी पाचव्या स्थानावर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारी झुलन गोस्वामी पाचव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अखेरचा सामना खेळून आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीला पूर्णविराम देणारी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी ही कधी काळी अव्वल मानांकित गोलंदाज होती.