Shubman Gill Statement On Virat Kohli- Rohit Sharma: आयपीएल २०२५ स्पर्धा झाल्यानंतर आता भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेला २० जूनपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ लवकरच इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणा आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी युवा कर्णधार शुबमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत गिलने रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

भारतीय संघासाठी हा दौरा अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण, या महत्वाच्या दौऱ्यावर संघतील सर्वात अनुभवी खेळाडू नसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम केलं आहे. विराटकडे इंग्लंड दौऱ्यावर फलंदाजीचा चांगलाच अनुभव होता. आता त्याच्या अनुभवाचा भारतीय संघाला फायदा घेता येणार नाहीये. तर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे, कर्णधार म्हणून शुबमन गिलची निवड करण्यात आली आहे. विराट आणि रोहितची जागा भरून काढणं कठीण असल्याचं शुबमन गिलने सांगितलं आहे.

हेही वाचा

रोहित- विराटबद्दल बोलताना गिल काय म्हणाला?

रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल बोलताना शुबमन गिल म्हणाला, ” प्रत्येक दौऱ्यावर जिंकण्याचा दबाव असतो. विराट आणि रोहित अनुभवी खेळाडू आहेत. दोघांनी बऱ्याच वर्षांपासून भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिले आहेत. त्यांची जागा भरून काढणं कठीण आहे. पण, दुसरा कुठलाही दबाव आमच्यावर नसेल. कारण खेळाडूंना दबावात कसं खेळायचं आणि जिंकायचं याची सवय झालेली असते. या संघात २ अनुभवी खेळाडू नसणार आहेत. पण या दौऱ्यासाठी युवा आणि अनुभवी खेळाडूंचा संमिश्र संघ निवडला आहे.”

असं आहे या मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक

पहिली कसोटी: २० ते २४ जून – हेडिंग्ले, लीड्स

दुसरी कसोटी: २ ते ६ जुलै – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

तिसरी कसोटी: १० ते १४ जुलै – लॉर्ड्स, लंडन

चौथी कसोटी: २३ ते २७ जुलै – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

पाचवी कसोटी: ३१ जुलै ते ४ ऑगस्ट – द ओव्हल, लंडन

या दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुबमन गिल ( कर्णधार) यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत ( यष्टीरक्षक/ उपकर्णधार), केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदिप सिंग, आकाश दीप, कुलदीप यादव</p>