Dilip Jajodia owner of Duke Ball Company will be investigated after the controversy: ॲशेस मालिका २०२३ अंतर्गत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांत पाचवा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला गेला होता. या सामन्यादरम्यान ३७व्या षटकात बदललेल्या चेंडूवर वाद निर्माण झाला आहे. त्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती. यानंतर आयसीसीला स्पष्टीकरण द्यावे लागले होते. आता हा चेंडू बनवणाऱ्या ड्यूक्सच कंपनीचे मालक दिलीप जाजोदिया यांनी आपले निवेदन दिले आहे.

बदलण्यात आलेला चेंडू पाच वर्षांचा असू शकतो, अशी शंका उपस्थित केली जात आहे. पहिल्या चेंडूपेक्षा तो खूपच नवीन दिसत होता. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग म्हणाला की, जुना चेंडू असल्यामुळे इंग्लंडला फायदा झाला आणि ते जिंकले. या आरोपांनंतर ड्यूक बॉल निर्मिती कंपनीचे मालक दिलीप जाजोदिया स्वतः या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. अशा आरोपांमुळे आपले नाव खराब होत असल्याचे त्यांना वाटत आहे.

प्रत्येक चेंडूवर लिहिलेली असते तारीख –

ड्यूक्स कंपनीचे मालक दिलीप जाजोदिया म्हणाले, “माझ्यावर परिणाम होत असल्याने मी स्वत: या प्रकरणाची चौकशी करेन. लोक चेंडूबद्दल चुकीच्या गोष्टी बोलू नये, हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. आम्ही केलेल्या प्रत्येक चेंडूवर तारखेचा शिक्का असतो. त्या चेंडूवर २०२३ लिहिलेले असेल. आम्ही बॉल ग्राऊंडला देतो. यावर ईसीबी आणि आयसीसीचे नियंत्रण नसते. हे सर्व ग्राऊंड अथॉरिटी काम आहे. ओव्हल कसोटीत सरेची ही जबाबदारी आहे.”

तारीख निघून जाणे खूप कठीण –

ते पुढे म्हणाले, “सरेला हंगाम सुरू होण्याआधी आमच्याकडून चेंडूचा पुरवठा होतो आणि मग ते त्यावर खेळतात. ते बॉक्समध्ये जुना चेंडू ठेवतील, असे मला वाटत नाही. बॉलवर तारीख सुबकपणे लिहिली जाते जेणेकरून सोनेरी रंग जरी उतरला, तरी तारीख निघून जात नाही. तारीख निघून जाणे सोपे नाही. मी असं म्हणत नाही की, ते अशक्य आहे पण त्याची शक्यता खूपच कमी आहे.”

हेही वाचा – ODI WC 2023: “उजव्या हाताच्या फलंदाजांमध्ये एकही टॉप ऑर्डर बॅट्समन..”; सलमान बटने सांगितल्या भारताच्या उणीवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उस्मान ख्वाजाने पंचांना दिली माहिती –

वास्तविक, हा सगळा वाद मूळ चेंडूचा रंग आणि बदललेल्या चेंडूचा याबाबत आहे. नवीन चेंडू गडद लाल रंगाचा होता आणि त्याच्या काठावर अक्षरे देखील दिसत होती. ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्वाजाने ही बाब पंचांना सांगितली. त्यानंतर हा सर्व गोंधळ सुरु झाला.