Most Runs Against Jasprit Bumrah In IPL : क्रिकेटच्या मैदानात सटीक यॉर्कर फेकून भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल करणारा गोलंदाज म्हणजे जसप्रीत बुमराह. टीम इंडियाचा हुकमी एक्का म्हणून बुमराहची ख्याती आहे. आयपीएलमध्ये बुमराह मुंबई इंडियन्ससाठी हुकमी गोलंदाज आहे. बुमराहच्या गोलंदाजीवर धावा कुटणे इतकं सोपं नसतं. पण काही फलंदाजांनी बुमराहच्या गोलंदाजीवर आक्रमक फटके मारून मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला आहे. जाणून घेऊयात या तीन फलंदाजांबाबत ज्यांनी बुमराहच्या गोलंदाजीवर आयपीएलच्या मैदानात चांगलीच धुलाई केली आहे.

१) विराट कोहली</strong>

जसप्रीत बुमराहे जगातील दिग्गज फलंदाजांना पिचवर गुडघे टेकायला भाग पाडलं आहे. आयपीएलमध्ये बुमराहने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची पहिली विकेट घेतली होती. पण आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणारा विराटने बुमराहच्या गोलंदाजीवरही सर्वात जास्त धावा कुटल्या आहेत. विराटने १४ इनिंगमध्ये बुमराहचा सामना केला आहे. त्याने बुमराहच्या गोलंदाजीवर १५० च्या स्ट्राईक रेटने आणि ३१.५० च्या सरासरीनं १२६ धावा केल्या आहेत. बुमराहच्या गोलंदाजीवर विराटने १४ चौकार आणि ५ षटकार ठोकले आहेत. विराट आयपीएलमध्ये बुमराहच्या गोलंदाजीवर फक्त चारवेळा बाद झाला आहे.

नक्की वाचा – IPL History: ‘या’ ५ खेळाडूंनी कंबर कसली अन् IPLमध्ये इतिहास रचला, सर्वात जास्त झेल कुणी पकडले? वाचा सविस्तर

२) एबी डिविलियर्स

क्रिडाविश्वात मिस्टर ३६० डिग्री प्लेयर म्हणून ठसा उमटवलेल्या एबी डिविलियर्सने आयपीएलमध्ये १८४ सामन्यांत ३९.७० च्या सरासरीनं ५१६२ धावा कुटल्या आहेत. यामध्ये तीन शतक आणि ४० अर्धशतकांचा समावेश आहे. डिविलियर्सही त्या फलंदाजांमध्ये सामील आहे, ज्यांनी बुमराहच्या गोलंदाजीवर धावा केल्या आहेत. बुमराह आणि डिविलियर्सचा आयपीएलमध्ये १३ वेळा सामना झाला आहे. या १३ इनिंगमध्ये १४७.०५ च्या स्ट्राईक रेटने आणि ४१.६६ च्या सरासरीनं डिविलियर्सने १२५ धावा केल्या आहेत. बुमराहच्या गोलंदाजीवर डिविलियर्स फक्त तीनवेळा बाद झाला आहे. त्याने बुमराहला ९ चौकार आणि ८ षटकार ठोकले आहेत. पण यावेळी डिविलियर्स आयपीएलमध्ये खेळणार नाही. त्याने गतवर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

३) के एल राहुल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुमराहच्या गोलंदाजीवर आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्यांच्या लिस्टमध्ये के एल राहुल तिसऱ्या स्थानावर आहे. के एल राहुल टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. के एल राहुलनेही बुमराहच्या गोलंदाजीचा समाचार घेतला आहे. बुमराह आणि राहुलचा आयपीएलमध्ये १० वेळा आमना-सामना झाला आहे. या १० इनिंगमध्ये १३२.१४ च्या स्ट्राईक रेटने आणि ५५.५० च्या सरासरीनं राहुलने १११ धावा केल्या आहेत. बुमराहच्या गोलंदाजीवर राहुल फक्त दोनवेळा बाद झाला आहे. राहुलने बुमराहला १० चौकार आणि ४ षटकार ठोकले आहेत.