विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे भारतातील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. या जोडीने क्रिकेट आणि बॉलीवूड कनेक्शन चांगले राखले. आता त्यांना एक गोंडस मुलगी आहे. विराट-अनुष्कामध्ये किती प्रेम आहे, हे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून चाहत्यांना कळते.

विराट आणि अनुष्का दोघेही कुठेही, जातात तेव्हा लोक त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. अशा परिस्थितीत या सेलिब्रिटी जोडप्याला अधिक संरक्षणाची गरज असते. या जोडप्याने त्यांच्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या अंगरक्षकाचा पगार एका मीडिया रिपोर्टमध्ये उघड झाला आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी प्रकाश सिंग उर्फ ​​सोनू नावाच्या बॉडीगार्ड ची नियुक्ती केली आहे, जो बहुतेक सार्वजनिक ठिकाणी अनुष्कासोबत दिसतो. सोनूला बॉडीगार्ड म्हणून मोठी रक्कम मिळत असल्याचे कळते.

हेही वाचा – VIDEO : गौतम गंभीरचा विराटला टोमणा?; रोहितबाबत म्हणाला, ‘‘भारतीय क्रिकेट चांगल्या हातात…”

डीएनएच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, अनुष्का शर्मा सोनूला दरवर्षी १.२ कोटी रुपये म्हणजेच १० लाख रुपये प्रति महिना देते. सोनू अनुष्का शर्मासोबत अनेक वर्षांपासून आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली २०१७ मध्ये विवाहबद्ध झाले. त्यानंतर सोनूने विराट कोहलीलाही सुरक्षा देण्यास सुरुवात केली. विराटकडे स्वत:च्या सुरक्षेसाठी वेगवेगळे लोक आहेत. विराट आणि अनुष्कासाठी सोनू घरातील सदस्याप्रमाणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट कोहली सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तयारी करत असून, तिथे तो तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. त्यानंतर भारतीय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे, ज्यामध्ये विराट कोहली खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच बीसीसीआयने रोहित शर्माला वनडेचा नवा कर्णधार बनवले आहे.