पहिल्या सराव सत्रात हॅमिल्टन जलद

मोनॅको ग्रां. प्रि. शर्यतीच्या पहिल्या सराव सत्रात मर्सिडीजच्या लुइस हॅमिल्टनने सर्वात जलद वेळ नोंदवली आहे.

मोनॅको ग्रां. प्रि. शर्यतीच्या पहिल्या सराव सत्रात मर्सिडीजच्या लुइस हॅमिल्टनने सर्वात जलद वेळ नोंदवली आहे. मात्र या शर्यतीत पहिल्यांदाच सहभाग घेणाऱ्या टोरो रोसो संघाच्या १७ वर्षीय मॅक्स वेस्र्टाप्पेनने कडवी टक्कर देत दुसरे स्थान पटकावले.
विश्वविजेत्या हॅमिल्टनने यंदाच्या सत्रात पाचपैकी तीन शर्यतींमध्ये जेतेपद पटकावले आहे आणि त्याने नुकताच मर्सिडीजशी पुन्हा तीन वर्षांचा करार केला आहे.
हॅमिल्टनने १ मिनिट १८.७५० सेकंदांत टप्पा पूर्ण केला, तर मॅक्सने १ मिनिट १८.८९९ सेकंदांत प्रति टप्पा अशी वेळ नोंदवली. त्यापाठोपाठ रेड बुलच्या डॅनिएल रिकिआडरे आणि फेरारीच्या सेबॅस्टियन वेटेल यांनी अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान पटकावले. टोरो रोसोच्या कार्लोस सेंजला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dominant lewis hamilton secures practice double

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या