पुण्याचे डॉ. कौस्तुभ राडकर यांनी आपली २९ वी आयर्न मॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. आयर्न मॅनसाठी पोहणे, धावणे आणि सायकल चालवणे अशा तिन्ही स्पर्धांमध्ये शारीरिक क्षमतेची कसोटी असते. या स्पर्धेत ३.८ किमी पोहणे, १८०.२ किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी धावणे अशी स्पर्धा असते. ही स्पर्धा १७ तासात पूर्ण करायची असते. हे आव्हान डॉ. कौस्तुभ राडकर यांनी १३ तास १४ मिनिटं आणि १६ सेकंदात पूर्ण केलं. त्यामुळे त्यांना आयर्न मॅन टायटल मिळालं आहे. अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय आहेत.

“मी माझी २९ वी आयर्नमॅन स्पर्धा स्पेनच्या मलोर्का येथे यशस्वीरित्या पूर्ण केली. ही स्पर्धा पूर्ण करणारे जगात मूठभर लोकं आहेत. “, असं ट्वीट डॉ. कौस्तुभ राडकर यांनी केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी या कामगिरीबाबत फेसबुकवरही लिहिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००८ मध्ये साली डॉ. कौस्तुभ राडकर यांनी पहिल्यांदा या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर सातत्याने ते या स्पर्धेत सहभागी होत आहेत. सध्याच्या घडीला ही स्पर्धा ४० हून अधिक देशात भरवली जाते. दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, युरोप, आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडात या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. प्रत्येक स्पर्धेत दोन हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी होतात.