scorecardresearch

ENG vs NZ Test Series: ‘हे Bazball किंवा Benball नाही’, बेन स्टोक्सने सांगितले इंग्लंडचा संघ कोणते क्रिकेट खेळतोय

England vs New Zealand: इंग्लंडचा संघ कोणते क्रिकेट खेळत आहे, हे बेन स्टोक्सने सांगितले आहे. तो बॅझबॉल किंवा बेनबॉल नाही असेही त्याने म्हटले आहे. आम्ही कसोटी क्रिकेट खेळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ENG vs NZ 1st Test Not Bazball Not Benball Just English Test cricket says Ben Stokes
बेन स्टोक्स (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

जेव्हापासून इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी संघाची धुरा सांभाळली, तेव्हापासून इंग्लंडचा संघ वेगळे आणि आक्रमक क्रिकेट खेळत आहे. यामध्ये इंग्लंडला यशही मिळाले आहे. कारण गेल्या डझनभर कसोटी सामन्यांमध्ये इंग्लिश संघ फक्त एकच सामना हरला आहे. मीडिया आणि चाहत्यांनी या दृष्टिकोनाला बॅझबॉल म्हटले आहे, परंतु बेन स्टोक्स सहमत नाही.

इंग्लंडच्या संघाने पहिल्या कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध दमदार विजय मिळवला. त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्सने मीडिया आणि चाहत्यांना त्याच्या आक्रमक पध्दतीचा ‘बॅझबॉल’ किंवा ‘बेनबॉल’ असा उल्लेख करू नये, असे आवाहन केले आहे. त्याऐवजी, त्यांनी त्याला “जस्ट टेस्ट क्रिकेट.. इंग्लिश टेस्ट क्रिकेट” म्हणावं असं त्याला वाटतं. डे-नाईट खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर २६७ धावांनी मोठा विजय मिळवला. इंग्लंडने ११ पैकी १० वा कसोटी सामना जिंकला.

मॅक्युलमने इंग्लंडच्या कसोटी संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारताच त्याला बेझबॉल म्हटले गेले. क्रिकइन्फोचे पत्रकार अँड्र्यू मिलर यांनी हा शब्द तयार केला होता. बेन स्टोक्स म्हणाला, “मला वाटले की मी आणि बाजने पुरेसे बोलले होते की लोकांनी हे आता बंद केले पाहिजे. परंतु ते पुन्हा पॉप अप होत आहे. तथापि, बाजच्या (ब्रेंडन मॅक्युलम) बॅगवर रुटीने (जो रूट) ‘बेसबॉल’चा एक छोटा बॅज चिकटवला आहे.”

हेही वाचा – 15 Years of IPL: एमएस धोनीला मागे टाकत रोहित शर्मा ठरला सर्वोत्कृष्ट आयपीएल कर्णधार; बाकीचे पाच पुरस्कार कोणाला मिळाले? घ्या जाणून

बेन स्टोक्स पुढे म्हणाला, “तो (मॅक्युलम) स्वतःपेक्षा सगळ्यांवर प्रेम करतो. तो खेळाडू म्हणून तसाच होता आणि कर्णधार म्हणूनही तो तसाच होता. आता प्रशिक्षक म्हणूनही तो तसाच आहे, हे आम्ही पाहिले आहे. मॅक्कलमने स्वतः एकदा सांगितले आहे की त्याला बॅझबॉल काय आहे याची कल्पना नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 16:11 IST
ताज्या बातम्या