ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी२० विश्वचषकाचा आज समारोप होणार आहे. टी२० विश्वचषकाची अंतिम फेरीतील सामना रविवारी (१३ नोव्हेंबर) रोजी ऐतिहासिक मेलबर्न मधील एमसीजी म्हणजेच मेलबर्न क्रिकेट मैदानवर होणार आहे. टी२० विश्वचषक २०२२ च्या विजेतेपदाचा दावेदारीसाठी इंग्लंड आणि पाकिस्तान हे दोन संघ एकमेकांमध्ये भिडणार आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली असून मैदानावरही आपले अंतिम संघ उतरवण्यासाठी सज्ज केली आहे. इंग्लंड संघ दुखापतींशी झुंजत आहे डेव्हिड मलान आणि मार्क वुड भारताविरुद्धच्या सामन्यात खेळले नाहीत. असे असतानाही त्यांना १० गडी राखून विजय मिळवण्यात यश आले होते.

अंतिम सामना सुरु होण्यापूर्वी आता पाकिस्तान संघासाठी एक मोठा धोका निर्माण झाला आहे. कारण इंग्लंडच्या संघात आता एक मॅचविनर खेळाडू परतला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संघासाठी ही एक धोक्याची घंटा समजली जात आहे. कारण प्रतिस्पर्धी संघाचा कर्दनकाळ समजला जाणारा खेळाडू आता इंग्लंडच्या ताफ्यात परतला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या संघाचे धाबे दणाणले आहेत. कारण आतापर्यंत या विश्वचषकात तब्बल ९ विकेट्स या एकट्या खेळाडूने काढलेल्या आहेत.

मार्क वूड आणि डेव्हिड मलान यांची संघात वापसी

इंग्लंडचा संघ मंगळवारी आता सराव करत होता. त्यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड हा जायबंदी झाला असल्याचे समोर आले होते. सराव करत असताना मार्क वुडला गंभीर दुखापत झाली होती. ही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची होती की, त्याने सराव करणे तात्काळ सोडून दिले आणि त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली होती. त्यामुळे ही दुखापत आता गंभीर स्वरुपाची असल्याचे दिसत होती आणि त्यामुळेच त्याला भारताविरुद्धच्या सामन्यात खेळवण्यात आले नव्हते. पण आता वुड फिट झाला आहे आणि पाकिस्तानविरुद्धच्या फायनलपूर्वी त्याने नेट्समध्ये सराव केला आहे. त्यामुळे आता वुड्स सराव केल्यावर फिट असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता फायनलमध्ये वुडला संधी देण्यात येऊ शकते, असे संकेत मिळत आहेत वुडने आतापर्यंतच्या चार सामन्यांमध्ये ९ गडी बाद केले आहेत.

पाकिस्तान संघात कुठलेही बदल होणार नाहीत

पाकिस्तानचा संघ सलग चार सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत तो त्याच्या विजयी संघात फारसा बदल करू शकत नाही. याचे कारणही दिसून येत नाही. पाकिस्तानी संघात चार वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटू आहेत. मोहम्मद हॅरिसनेही आपल्या फलंदाजीतील शक्तीची कमतरता भरून काढली आहे. उपांत्य फेरीत रिझवान आणि बाबर फॉर्ममध्ये परतले आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानी संघ समतोल दिसत असला तरी विजयासाठी ती गोलंदाजांवर अवलंबून असेल.

हेही वाचा :  World cup final: सामन्याच्या दिवशी पाकिस्तानी संघ राहणार उपाशी; कारण जाणून वाटेल आश्चर्य 

सामना कुठे, कधी आणि किती वाजता

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड अंतिम सामना हा दुपारी १.०० वाजता सुरु होणार असून तुम्ही स्टार स्पोर्ट्स वर थेट प्रेक्षपण पाहू शकतात. तसेच हॉटस्टार वर पण थेट प्रेक्षपण तुम्ही डीजीटल स्वरुपात पाहू शकतात.

पाकिस्तान संघ

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंड संघ

जॉस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, लिएम लिव्हिंगस्टोन, डेवीड मलान, आदील राशिद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रिसे टॉप्ली, डेव्हिड विली, ख्रिस वॉक्स, मार्क वूड, अ‍ॅलेक्स हेल्स; राखीव – लिएम डॉसन, रिचर्ड ग्लीसन, टायमल मिल्स