England announced their 15 man squad for the third Test: रविवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांतील अॅशेस मालिकेतील तिसरा सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ४३ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यातील पराभव इंग्लंडच्या खूपच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांनी लगेचच हेडिंग्ले येथील तिसऱ्या सामन्यासाठी १५ जणांचा संघ जाहीर केला.

खांद्याला दुखापत असूनही हेडिंग्ले कसोटीसाठी ऑली पोपला इंग्लंड संघात कायम ठेवण्यात आले आहे. लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये पोपला खांद्याला दुखापत झाली होती. सोमवारी पोपच्या खांद्याचे स्कॅन होणार असल्याचे वृत्त आहे. यानंतरच त्याची दुखापत किती गंभीर आहे हे स्पष्ट होईल.

डॅन लॉरेन्स हा इंग्लंड संघातील एकमेव अतिरिक्त फलंदाज आहे. जर ऑली हेडिंग्ले कसोटीत खेळण्यासाठी योग्य वाटला नाही, तर तिसऱ्या क्रमांकावर ऑली पोपची जागा घेऊ शकतो. सरेचा यष्टिरक्षक फलंदाज बेन फोक्सकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष झाले आहे. मोईन अली तिसऱ्या कसोटीत खेळेल, अशी इंग्लंडला आशा आहे. त्याचा बॅकअप म्हणून संघात सामील झालेला युवा फिरकी गोलंदाज रेहान अहमदलाही संघातून वगळण्यात आले आहे.

हेही वाचा – ENG vs AUS: जॉनी बेअरस्टोच्या वादग्रस्त विकेटनंतर ब्रेंडन मॅक्युलमचा १८ वर्षांपूर्वीचा VIDEO व्हायरल, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी ६ कसोटी खेळणारा डरहमचा वेगवान गोलंदाज मॅथ्यू पॉट्सलाही वगळण्यात आले आहे. लॉर्ड्सवर खेळणाऱ्या चार वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड हे संघातील इतर सीम-बॉलिंग पर्याय आहेत. तिसऱ्या कसोटीसाठी वुडची संघात निवड होऊ शकते.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट, जोस टंग, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचे, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४१६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ३२५ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावाच्या जोरावरऑस्ट्रेलियाला ९१ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २७९ धावा केल्या आणि इंग्लडला ३७१ धावांचे लक्ष्य दिले, परंतु प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ३२७ धावांवर गारद झाला.