‘आयपीएल’ लिलावात सॅम करन सर्वात महागडा खेळाडू; स्टोक्स, ब्रूकवरही मोठी बोली

वृत्तसंस्था, कोची : विश्वविजेत्या इंग्लंड संघातील खेळाडू शुक्रवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या छोटेखानी लिलावातील प्रमुख आकर्षण ठरले. इंग्लंडचा डावखुरा अष्टपैलू सॅम करनला पंजाब किंग्जने तब्बल १८.५० कोटी रुपयांत खरेदी केले. त्यामुळे तो ‘आयपीएल’ खेळाडू लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स आणि युवा फलंदाज हॅरी ब्रूक यांच्यावरही मोठी बोली लावण्यात आली. लिलावात दहा संघांनी मिळून एकूण ८० खेळाडूंना खरेदी केले. 

MS Dhoni First Player to Play 250 Matches for CSK
MI vs CSK IPL 2024 : एमएस धोनीने रचला इतिहास! चेन्नई सुपर किंग्जसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
MS Dhoni 300 Dismissals in T20
DC vs CSK : महेंद्रसिंग धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला यष्टीरक्षक
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!

यंदा ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे इंग्लंडने जेतेपद पटकावले होते आणि करनने सहा सामन्यांत १३ बळी मिळवत इंग्लंडच्या यशात महत्त्वाची भूमिका होती. त्याने या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवला होता. त्यामुळे ‘आयपीएल’ खेळाडू लिलावात करनला खरेदी करण्यासाठी सहा संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज हे संघ करनला खरेदी करण्यासाठी उत्सुक दिसले. अखेरीस पंजाबने विक्रमी बोलीसह करनला आपल्या संघात समाविष्ट केले. 

इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू स्टोक्सवर या लिलावातील तिसरी सर्वात मोठी बोली लागली. स्टोक्सला महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने १६.२५ कोटी रुपयांच्या बोलीसह आपल्या संघात स्थान दिले. इंग्लंडचा युवा फलंदाज ब्रूकला १३.२५ कोटी रुपयांच्या बोलीसह सनरायजर्स हैदराबादने खरेदी केले. ब्रूकने नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेच्या तीनही सामन्यांत शतके झळकावली होती. सनरायजर्सनेच इंग्लंडचा लेग-स्पिनर आदिल रशीला मूळ किंमत २ कोटी रुपयांत खरेदी केले. बंगळूरुने इंग्लंडचा अष्टपैलू विल जॅक्सवर ३.२० कोटी, तर वेगवान गोलंदाज रीस टॉपलीवर १.९० कोटी रुपयांची विजयी बोली लावली.

मॉरिसवरील बोलीचा विक्रम मोडीत

पंजाबने १८.५० कोटी रुपयांच्या विक्रमी बोलीसह करनला आपल्या संघात समाविष्ट केले. यापूर्वी लिलावातील सर्वात महागडय़ा खेळाडूचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू ख्रिस मॉरिसच्या नावे होता. त्याला २०२१च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने १६.२५ कोटी रुपयांत खरेदी केले होते. करनने यापूर्वी ‘आयपीएल’मध्ये ३२ सामन्यांत ३२ बळी मिळवतानाच दोन अर्धशतकांच्या साहाय्याने ३३७ धावा केल्या आहेत.

यंदाचे सर्वात महागडे खेळाडू

१७.५०कोटी कॅमेरून ग्रीन, मुंबई

१६.२५कोटी बेन स्टोक्स, चेन्नई

१६कोटी निकोलस पूरन, लखनऊ

१३.२५कोटी हॅरी ब्रूक, हैदराबाद

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्रीन मुंबईकडे

यंदाच्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा २३ वर्षीय अष्टपैलू कॅमेरून ग्रीन दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने १७.५ कोटी रुपयांत खरेदी केले. आक्रमक फलंदाजी आणि उपयुक्त मध्यमगती गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ग्रीनला यंदा ‘आयपीएल’मध्ये पदार्पणाची संधी मिळू शकेल. दशकभरापासून मुंबईच्या संघाचा आधारस्तंभ असलेला अष्टपैलू किरॉन पोलार्डने यंदाच्या हंगामापूर्वी ‘आयपीएल’मधून निवृत्ती पत्करली. आता त्याची जागा घेण्याची जबाबदारी ग्रीनवर असेल.

मयांक अगरवाल सनरायजर्सकडे

भारताचा सलामीवीर आणि पंजाब किंग्जचा माजी कर्णधार मयांक अगरवालला ८.२५ कोटी रुपयांच्या विजयी बोलीसह सनरायजर्स हैदराबादने आपल्या संघात समाविष्ट केले. तो यंदाच्या लिलावातील सर्वांत महागडा भारतीय खेळाडू ठरला. तसेच युवा वेगवान गोलंदाज शिवम मावीवर ६ कोटी रुपयांची बोली लागली. त्याला गतविजेत्या गुजरात टायटन्सने खरेदी केले.

खरेदी केलेले खेळाडू

मुंबई इंडियन्स

  • कॅमेरून ग्रीन (१७.५० कोटी)
  • जाय रिचर्डसन (१.५० कोटी)
  • पियुष चावला (५० लाख)
  • डुवान जॅन्सेन (२० लाख)
  • विष्णू विनोद (२० लाख)
  • नेहल वढेरा (२० लाख)
  • राघव गोयल (२० लाख)

सनरायजर्स हैदराबाद

  • हॅरी ब्रूक (१३.२५ कोटी)
  • मयांक अगरवाल (८.२५ कोटी)
  • हेन्रिक क्लासन (५.२५ कोटी)
  • आदिल रशीद (२ कोटी)
  • मयांक मरकडे (५० लाख)
  • विवरांत शर्मा (२.६ कोटी)
  • समर्थ व्यास (२० लाख)
  • सनवीर सिंग (२० लाख)
  • उपेंद्र यादव (२५ लाख)
  • मयांक डागर (१.८० कोटी)
  • नितीश कुमार रेड्डी (२० लाख)
  • अकील हुसेन (१ कोटी)
  • अनमोलप्रीत सिंग (२० लाख)

लखनऊ सुपर जायंट्स

  • निकोलस पूरन (१६ कोटी)
  • जयदेव उनाडकट (५० लाख)
  • यश ठाकूर (४५ लाख)
  • रोमारिओ शेफर्ड (५० लाख)
  • अमित मिश्रा (५० लाख)
  • प्रेरक मंकड (२० लाख)
  • स्वप्नील सिंह (२० लाख)
  • युधवीर सिंग (२० लाख)

पंजाब किंग्ज

  • सॅम करन (१८.५० कोटी)
  • सिकंदर रझा (५० लाख)
  • हरप्रीत भाटिया (४० लाख)
  • विद्वथ कावेरप्पा (२० लाख)
  • मोहित राठी (२० लाख)
  • शिवम सिंग (२० लाख)

कोलकाता नाइट रायडर्स

  • नारायण जगदीशन (९० लाख)  
  • वैभव अरोरा (६० लाख)
  • सुयश शर्मा (२० लाख)
  • डेव्हिड विसा (१ कोटी)
  • कुलवंत खेजरोलिया (२० लाख)
  • लिटन दास (५० लाख)
  • मनदीप सिंग (५० लाख)
  • शाकिब अल हसन (१.५० कोटी)

राजस्थान रॉयल्स

  • जेसन होल्डर (५.२५ कोटी)
  • डोनोवन फरेरा (५० लाख)
  • कुणाल राठोड (२० लाख)
  • अ‍ॅडम झॅम्पा (१.५ कोटी)
  • केएल आसिफ (३० लाख)
  • मुरुगन अश्विन (२० लाख)
  • अकाश वशिष्ठ (२० लाख)
  • अब्दुल बसिथ (२० लाख)
  • जो रूट (१ कोटी)

चेन्नई सुपर किंग्ज

  • बेन स्टोक्स (१६.२५ कोटी)
  • अजिंक्य रहाणे (५० लाख)
  • शेक रशीद (२० लाख)
  • निशांत सिद्धू (६० लाख)
  • काएल जेमिसन (१ कोटी)
  • अजय मंडल (२० लाख)
  • भगत वर्मा (२० लाख)

गुजरात टायटन्स

  • केन विल्यम्सन (२ कोटी)
  • ओडीन स्मिथ (५० लाख)
  • केएस भरत (१.२० कोटी)
  • शिवम मावी (६ कोटी)
  • उर्विल पटेल (२० लाख)
  • जोश लिटिल (४.४ कोटी)
  • मोहित शर्मा (५० लाख)

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु

  • रीस टॉपली (१.९० कोटी)
  • हिमांशू शर्मा (२० लाख)
  • विल जॅक्स (३.२० कोटी)
  • मनोज भांडगे (२० लाख)
  • राजन कुमार (७० लाख)
  • अविनाश सिंह (६० लाख)
  • सोनू यादव (२० लाख)

दिल्ली कॅपिटल्स

  • फिल सॉल्ट (२ कोटी)
  • इशांत शर्मा (५० लाख)
  • मुकेश कुमार (५.५० कोटी)
  • मनीष पांडे (२.४० कोटी)
  • रायली रूसो (४.६० कोटी)