नवीन वर्षाच्या आगमनासोबत भारतीय संघासमोर एक नवीन क्रिकेट कॅलेंडर आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळण्याव्यतिरिक्त भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, आशिया कप, वर्ल्ड कप २०२३ स्पर्धा खेळायच्या आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायचा आहे.

टीम इंडियासाठी गेलं वर्ष विशेष चांगलं नव्हतं. रोहित अँड कंपनीला टी-२० विश्वचषक आणि आशिया चषक यांसारख्या स्पर्धांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने २०२२ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने मिळवलेला तो विशेष पराक्रमही गमावला आहे.

भारताने सहा वर्षांनी गमावले वर्चस्व –

कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर राहत टीम इंडियाने २०२२ या वर्षाला निरोप दिला. आतापर्यंत सलग सहा वर्षे कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहत सरत्या वर्षांना निरोप दिली होता. परंतु २०२२ वर्षाचा निरोप घेताना पहिल्यादाच टीम इंडियाला अव्वल स्थान राखता आले नाही. इंग्लंड संघाने यावर्षी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर राहून वर्षाचा शेवट केला आहे. ज्यामुळे भारत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.

हेही वाचा – MS Dhoni Celebration: माहीने झगमगत्या दुबईमध्ये कुटुंबासह साजरे केले नवीन वर्ष; मुलीसह आनंद घेताना दिसला माजी कर्णधार, पाहा शानदार व्हिडिओ

विराटने टीम इंडियाला कसोटीत मिळवून दिली होते वर्चस्व –

२०१४ मध्ये विराट कोहलीला कसोटी संघाची कमान मिळाली होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने खेळाच्या मोठ्या फॉरमॅटमध्ये नवीन उंची गाठली. २०१६ मध्ये भारताचा संघ कसोटीत नंबर-१ बनला होता. तेव्हापासून, टीम इंडिया पहिल्या स्थानावर राहत या फॉरमॅटमध्ये सतत वर्ष संपवत होती. २०२२ ला सुरुवात झाली तेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. कर्णधारपद सोडण्यापूर्वी विराटच्या नेतृत्वाखाली संघाने कसोटी मालिका १-२ अशी गमावली होती. यानंतर रोहित युग सुरू झाले.

हेही वाचा – Team India: टीम इंडिया २०२३ मध्ये मोठ्या स्पर्धांना करणार टार्गेट; ‘या’ ८ गोष्टीवर असेल नजर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडची दमदार कामगिरी –

कसोटी क्रमवारीत टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर घसरण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले, टीम इंडियाने या फॉरमॅटमध्ये कमी सामने खेळले आणि दुसरे म्हणजे, बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघाची दमदार कामगिरी. ब्रेंडन मॅक्युलम कसोटी प्रशिक्षक झाल्यापासून इंग्लंड या फॉरमॅटमध्ये आक्रमक क्रिकेट खेळत आहे. यामुळेच इंग्लिश संघाने गेल्या १० पैकी नऊ सामने जिंकले आहेत. इंग्लंडला नंबर-१ कसोटी संघ म्हणून उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे.