Faf Du Plessis Video Goes Viral: अबुधाबी T10 लीगचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक सामन्यात एकापेक्षा एक घटना, विक्रम पाहायला मिळत आहे. मात्र, मॉरिसन सॅम्प आर्मी आणि दिल्ली बुल्स यांच्यातील सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस थोडक्यात बचावला. खरंतर, सामन्यादरम्यान फाफ डू प्लेसिसची सीमारेषेजवळ बॉल बॉयशी जबरदस्त टक्कर झाली.
फाफ डु प्लेसिस हा अबू धाबी टी-१० लीगमध्ये मॉरिसन सॅम्प आर्मी संघाकडून खेळत आहे. या सामन्यात दिल्ली बुल्सचा फलंदाज टिम डेव्हिडने इसुरु उडानाच्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरवर जबरदस्त शॉट मारला. चेंडू हवेत उडून मैदानावर पडला आणि सीमारेषेच्या दिशेने जात होता. फाफ डु प्लेसिसने हा चेंडू रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण चेंडू तो रोखू शकला नाही.
फाफ डू प्लेसिस ज्या प्रकारे चेंडू रोखण्यासाठी धावला, त्यावरून तो चौकार वाचवण्यात यशस्वी होईल, असे वाटत होते. त्याचवेळी बॉल बॉयही सीमारेषेच्या बाहेर चेंडूची वाट पाहत होता. फाफ डू प्लेसिस वायूवेगाने त्या चेंडूच्या दिशेने धावत असल्याचे बॉल बॉयला कळले नाही आणि बॉल बॉय चेंडू उचलण्यासाठी खाली वाकला. मात्र, डु प्लेसिसने बॉल बॉयला पाहिले आणि कसा तरी त्याला वाचवण्यासाठी त्याने त्याच्यावरून उडी घेतली.
डु प्लेसिसने त्याला वाचवण्यासाठी बॉल बॉयवरून गुलांटी उडी घेत जाहिरातींचा पडदा ओलांडून त्याच्यामागे जाऊन खाली पडला. यावेळी, चांगली गोष्ट म्हणजे फाफ डू प्लेसिस किंवा बॉल बॉय या दोघांनाही काही मोठी दुखापत झाली नाही आणि दोघेही सुरक्षित राहिले.
बॉल बॉयशी टक्कर झाल्यानंतर तो ज्या पद्धतीने पडला, त्यामुळे फाफ डू प्लेसिस खूपच नाराज दिसला. बॉल बॉयमुळे आपल्याला किती मोठी जोखीम पत्करावी लागली हे डु प्लेसिसला माहित होते. म्हणूनच मैदानात परत जाताना डु प्लेसिसने बॉल बॉयकडे एक कटाक्ष टाकला आणि मग मैदानात गेला. सुदैवाने डु प्लेसिसला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
– Criket Mania
– Faf Du Plessis….pic.twitter.com/cooNOcZWpzThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Criket Mania (@criketmania) November 29, 2024
फाफ डु प्लेसिसचा संघ MSA ने दिल्ली बुल्स विरुद्ध दोन धावांच्या कमी फरकाने विजय मिळवला. त्यामुळे प्रत्येक चेंडू अडवणं त्याला गरजेचं होतं. डू प्लेसिसने T10 स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे, त्याने ५ सामन्यात १९१ धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेट २३८.७५ आहे.