Fan interrupts play to meet Rohit Sharma : भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२४ चा सराव सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा ६० धावांनी पराभव केला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यादरम्यान एका चाहत्याने सुरक्षा तोडली आणि थेट टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला भेटण्यासाठी मैदानाच्या मध्यभागी गेला. त्यानंतर अमेरिकन पोलिसांनी चाहत्याच्या मानेला पकडून त्याचा चेहरा जमिनीवर टेकवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रोहित शर्माचा चाहता मैदानात घुसल्याचा व्हिडीओ व्हायरल –

त्याचे असे झाले की, बांगलादेशच्या डावात टीम इंडिया क्षेत्ररक्षणासाठी मैदानात हजर असताना एका व्यक्तीने सुरक्षा चकवा देत थेट मैदानात प्रवेश केला. या चाहत्याचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माला मिठी मारणे उद्देश होता. हा चाहता वेगाने धावत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मापर्यंत पोहोचला आणि त्याला मिठी मारली. यानंतर अमेरिकन पोलिसांनी या व्यक्तीला क्रूरपणे पकडून त्याची मान पकडली. अमेरिकन पोलिसांनी रोहित शर्मासमोर त्या चाहत्याला हातकडी लावली. यानंतर अमेरिकन पोलिसांनी त्या चाहत्याचे तोंड जमिनीवर दाबले.

रोहित शर्माने जिंकली मनं –

जेव्हा यूएस पोलिस या चाहत्याला क्रूरपणे पकडताना दिसले, त्यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पोलिसांना चाहत्यासोबत थोडी नम्रता दाखवण्याची विनंती करताना दिसला. रोहित शर्माच्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाने बांगलादेशचा ६० धावांनी पराभव केला. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने या सामन्यात दमदार फलंदाजी करताना २३ चेंडूत ४० धावा केल्या.

हेही वाचा – T20 WC 2024 : गोलंदाजीतील विलंब पडणार महागात, वर्ल्डकपपासून लागू होणार ‘स्टॉप क्लॉक’ नियम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीम इंडियाचा पहिला सामना ५ जूनला होणार –

टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेला आजपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या भूमीवर सुरूवात होत आहे. भारतीय संघाला टी-२० विश्वचषक २०२४ मधील आपला पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे. ९ जून रोजी भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. पाकिस्तानचा सामना केल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच १२ जूनला भारताचा सामना अमेरिकेशी होणार आहे. हे तिन्ही सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. यानंतर टीम इंडिया १५ जूनला कॅनडाचा सामना करण्यासाठी लॉडरहिलला रवाना होईल. भारताचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होतील.