Suryakumar Yadav performance in ODIs: टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचा वनडे क्रिकेटमध्ये खराब फॉर्म कायम आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार पुन्हा एकदा पहिल्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सूर्यकुमारला इनस्विंगरवर बाद केले. पहिल्या वनडेतही स्टार्कने सूर्याला बाद केले होते. आता त्याच्या जागी संजू सॅमसनल संधी दिली जावी, अशी मागणी जोर धरत आहे.

टी-२० मधील हिरो वनडे झिरो –

३२ वर्षीय सूर्यकुमारला एकदिवसीय क्रिकेटमध्ये मर्यादित संधी मिळाल्या आहेत, पण त्याचा फायदा घेण्यात तो अपयशी ठरला आहे. सूर्याने आतापर्यंत २२ एकदिवसीय सामन्यांच्या २० डावांमध्ये २५.४७ च्या सरासरीने ४३३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन अर्धशतके झळकली. शेवटच्या १४ डावांमध्ये, सूर्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. यादरम्यान तो केवळ पाच वेळा दुहेरी आकडा गाठू शकला, ज्यामुळे त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील खराब स्थिती स्पष्ट होते.

Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: १२ वर्षांनी शतक तरीही सेलिब्रेशन नाही, रोहित शर्माचा सामन्यानंतरचा व्हीडिओ चाहत्यांना करतोय भावुक
Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे
Ravindra Jadeja Earned Cricket Thalapathy Title From Chennai Super Kings
IPL 2024: रवींद्र जडेजाला CSKने दिलं स्पेशल नाव; थाला, चिन्ना थालासोबत आता चेन्नईच्या ताफ्यात ‘क्रिकेट थालापती’

सूर्याने श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले होते –

सूर्यकुमार यादवने १८ जुलै २०२३ रोजी कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यात त्याने नाबाद ३१ धावा करून खूप प्रभावित केले. त्यानंतर दुसऱ्या वनडेतही सूर्याने अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर असे वाटत होते की सूर्या मधल्या फळीत एक मजबूत खेळाडू म्हणून उदयास येईल, परंतु ९ फेब्रुवारी २०२२ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध ६४ धावांची इनिंग खेळल्यानंतर त्याने आपली लय गमावली.

हेही वाचा – IND vs AUS: भारताने नोंदवला वनडेतील सर्वात मोठा पराभव; ऑस्ट्रेलियाचा १० गडी राखून ऐतिहासिक विजय

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत, सूर्यकुमारला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मोठी धावसंख्या करून चौथ्या क्रमांकावर आपला दावा सांगण्याची संधी होती. परंतु सूर्याने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये ज्याप्रकारे कामगिरी केली, त्यामुळे एकदिवसीय विश्वाचषकातील त्याच्या संधी कमी होत आहेत. एकदिवसीय विश्वचषक भारतातच होणार आहे, अशा परिस्थितीत घरच्या खेळपट्ट्यांवर डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांसमोर त्याची कमजोरी अजिबात चांगले संकेत देत नाही.

मागील १० वनडे डावातील सूर्यकुमार यादवची कामगिरी –

९ धावा वि. वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन
८ धावा वि. वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन
४ धावा विरुद्ध न्यूझीलंड, ऑकलंड
३४* धावा विरुद्ध न्यूझीलंड, हॅमिल्टन
६ धावा विरुद्ध न्यूझीलंड, क्राइस्टचर्च
४ धावा विरुद्ध श्रीलंका, तिरुवनंतपुरम
३१ धावा विरुद्ध न्यूझीलंड, हैदराबाद
१४ धावा विरुद्ध न्यूझीलंड, इंदूर
० धावा वि ऑस्ट्रेलिया, मुंबई<br>० धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, विशाखापट्टणम

संजू सॅमसनची संधी देण्याची मागणी –

जर सूर्यकुमार यादव एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत नसेल तर त्याच्या जागी अन्य खेळाडूलाही संधी मिळायला हवी. संजू सॅमसन बऱ्याच दिवसांपासून संधीच्या शोधात आहे. त्यामुळे त्याला संधी देण्याची मागणी सोशल मीडियावरुन करत आहेत.यावर्षी श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दुखापत झाल्यापासून संजूला पुन्हा टीम इंडियात परतण्याची संधी मिळालेली नाही. संजू सॅमसनने आतापर्यंत भारतासाठी ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांसह ६६ च्या प्रभावी सरासरीने 330 धावा केल्या आहेत. संजू सॅमसनची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ८५ आहे.