भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणजे महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात यश मिळवून दिले आहे. टी२० आणि एकदिवसीय असे दोन्ही विश्वचषक जिंकवून दिले असून देशभरातच नाही तर जगामध्ये त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. धोनीच्या याच प्रसिद्धीमुळे म्हैसूरच्या चामुंडेश्वरी वॅक्स म्युजियममध्ये धोनीचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. पण मेणाच्या याच पुतळ्यावर चाहत्यांनी मजेशीर आणि तिखट प्रतिक्रिया देत ट्रोल केलं आहे. ट्रोलिंगचे कारण म्हणजे या मेणाच्या पुतळ्याचा आकार चुकला असून तो धोनीसारखा हुबेहूब  वाटत नसल्याने चाहत्यांनी म्युजिअम आणि पुतळा तयार करणाऱ्याला ट्रोल करत मीम्स बनवायला सुरुवात केली. यातील काही मजेशीर मीम्स पाहूया…

आयसीसीचे  सर्व चषक भारताला जिंकवून देणारा सर्वात यशस्वी कर्णधार एम एस धोनी आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर यांचा भारतात खूप मोठा चाहता वर्ग आहे. भारताव्यतिरिक्त या दोन्ही खेळाडूंची फॅन फॉलोइंग परदेशातही मोठ्या प्रमाणात आहे. अजूनही तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना दिसतो. आतापर्यंतच्या त्याच्या कारकीर्दीवर एक नजर टाकूया,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत ९० कसोटी, ३५० एकदिवसीय आणि ९८ टी२० सामने खेळले असून त्यातील काही सामन्यात त्याने संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी सामन्यांमध्ये त्यानं ६ शतक, एक द्विशतक, ३३ अर्धशतक केलं आहेत. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ४ हजार ८७६ धावा केल्या आहेत. त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण १० हजार ७७३ धावा केल्या आहेत. यामध्ये १० शतक, ७९ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी२० क्रिकेटमध्ये त्यानं एकूण १ हजार ६१७ धावा केल्या आहेत. धोनीनं १९० आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्याने एकूण ४ हजार ४३२ धावा केल्या आहेत.