scorecardresearch

FIFA WC 2022: “मी घाबरलो होतो…” दुखापतीनंतर सावरलेल्या नेमारने शेअर केला वेदनादायी अनुभव

कतारमध्ये फिफा विश्वचषक सुरु असताना ब्राझीलचा मुख्य स्ट्रायकर ज्युनिअर नेमारला मोठी दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने कालच्या सामन्यात शानदार गोल करत संघाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवून दिला.

FIFA WC 2022: “मी घाबरलो होतो…” दुखापतीनंतर सावरलेल्या नेमारने शेअर केला वेदनादायी अनुभव
सौजन्य- फिफा विश्वचषक २०२२ (ट्विटर)

फिफा विश्वचषक २०२२ च्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव केल्यानंतर, ब्राझीलच्या खेळाडूंनी हा विजय महान खेळाडू पेलेला समर्पित केला. आजारी असलेल्या पेले यांच्यावर साओ पाउलो येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दक्षिण कोरियावर विजय मिळवल्यानंतर ८२ वर्षीय पेले यांचे पोस्टर्स दोहा येथील स्टेडियम ९७४ येथे ब्राझीलच्या खेळाडूंनी लावले आहेत. फुटबॉल इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक असलेले पेले गंभीर आजारी आहेत. मात्र, तो बरा होऊन घरी परतेल, असा विश्वास त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

कतारमध्ये फिफा विश्वचषक सुरु असताना ब्राझीलचा मुख्य स्ट्रायकर ज्युनिअर नेमारला मोठी दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने त्यातून स्वतःहा ला सावरत कालच्या सामन्यात शानदार गोल करत संघाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवून दिला. विश्वचषकाच्या किमान तीन आवृत्त्यांमध्ये गोल करणारा नेमार हा ब्राझीलचा तिसरा खेळाडू ठरला आहे. नेमारने २०१४, २०१८ आणि २०२२ विश्वचषकामध्ये गोल केले आहेत. नेमारच्या आधी पेले (१९५९, १९६२, १९६६, १९७०) आणि रोनाल्डो नाझारियो (१९९८, २००२, २००६) या महान फुटबॉलपटूंनी ही कामगिरी केली आहे. या बाबतीत पेले नेमार आणि रोनाल्डोच्या पुढे आहेत. नेमारने रोनाल्डो, अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी आणि पेरिसिक यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

हेही वाचा  : FIFA WC 2022: ब्राझिलचा स्टार खेळाडू नेमारने केला नवा विक्रम; रोनाल्डो, मेस्सी आणि पेरिसिक यांच्या पंगतीत सामील

नेमार म्हणाला ‘मी घाबरलो होतो’

नेमारच्या पुनरागमनामुळे ब्राझीलला चांगलीच ऊर्जा मिळाली त्यामुळेच ते पहिल्याच मिनिटापासून उत्कृष्ट आक्रमण करत एकमेकांना चेंडू पास देत संपर्कात होते. त्याने १३व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉटवरून गोल करत ब्राझीलसाठी पेलेच्या ७७ गोलच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याने कबूल केले की सर्बियाविरुद्धच्या विश्वचषक सलामीच्या सामन्यात दुखापत झाल्यानंतर त्याला वाटले की ही स्पर्धा आपल्यासाठी संपेल. नेमार म्हणाला, “ज्यावेळी मला दुखापत झाली तेव्हा माझ्यासाठी खूप कठीण रात्र होती. मी लाखो वेगवेगळ्या गोष्टींबद्दल विचार करत होतो. मला या विश्वचषकात पुन्हा खेळण्याची भीती वाटत होती, पण मला माझ्या सर्व सहकाऱ्यांची भीती वाटत होती आणि मला माझा पाठिंबा मिळाला. ज्या कुटुंबाने मला शक्ती दिली.”

हेही वाचा  : FIFA WC 2022: ब्राझीलच्या खेळाडूंनी दिग्गज फुटबॉलपटू पेलेला विजय केला समर्पित, दक्षिण कोरिया विश्वचषकातून बाहेर

सर्बियाविरुद्धच्या २-० च्या विजयादरम्यान नेमारच्या घोट्याला दुखापत झाली होती. तो हा विश्वचषक खेळू शकेल का याची खात्री संघाला देखील होती पण त्याला मात्र थोडी याबाबत शाशंकता होती. ब्राझिलियन फुटबॉल फेडरेशनचे (CBF) डॉक्टर रॉड्रिगो लस्मार यांनी सांगितले की, नेमारच्या लिगामेंटला दुखापत झाली होती.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 12:40 IST

संबंधित बातम्या