फिफा विश्वचषक २०२२ चा आज चौथा दिवस आहे. या स्पर्धेत चौथ्या दिवशीही चार सामने खेळवले जाणार आहेत. आज गट-फ आणि गट-ईचे संघ आमनेसामने आपसांत भिडणार आहेत. पहिला सामना मोरोक्को आणि क्रोएशिया यांच्यात होणार आहे. यानंतर जर्मनीचा सामना जपानशी होणार आहे. ई गटातील तिसऱ्या सामन्यात कोस्टा रिकाचा सामना स्पेनशी होणार असून दिवसाचा शेवटचा सामना बेल्जियम आणि कॅनडा यांच्यात आहे. मोरोक्कोविरुद्धच्या सामन्याआधी क्रोएशियाचा खेळाडू लुका मॉड्रिकने २०२२चा फिफा विश्वचषक आणि २०१८ सालचा विश्वचषक यातील तुलनात्मक फरक सांगत मोठे विधान केले आहे.

क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रिक म्हणाला की, “आमच्या संघाने २०१८ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या त्यांच्या आठवणी बाजूला ठेवल्या पाहिजेत आणि त्याऐवजी बुधवारी मोरोक्कोविरुद्धच्या आमच्या गट सामन्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.” २०१८ च्या रशियातील त्या वर्षीच्या विश्वचषकात तो बॅलन डी’ओर तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता, ज्याच्यामुळे क्रोएशियाने अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम फेरीत त्यांना फ्रान्सकडून ४-२ ने पराभव स्वीकारावा लागला होता.

Gautam Gambhir Argument With Umpire
KKR vs PBKS : पंजाबविरुद्धच्या सामन्यात गौतम गंभीर संतापला, लाइव्ह मॅचदरम्यान अंपायरशी भिडला, VIDEO व्हायरल
Royal Challengers Bangalore Unwanted Record
KKR vs RCB : आरसीबीच्या संघाने नोंदवला नकोसा विक्रम, IPL इतिहासात पहिल्यांदाच ‘या’ रेकॉर्डची झाली नोंद
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अ‍ॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल

“२०१८ च्या विश्वचषकादरम्यान आम्ही जे काही अनुभवले ते अविस्मरणीय होते परंतु आता ते बाजूला ठेवून यापुढे काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे,” असे मिडफिल्डर लुका मॉड्रिकने मंगळवारी क्रोएशियाच्या मोरोक्कोविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी सांगितले. तो पुढे म्हणतो,“रशियामध्ये झालेल्या विश्वचषक संघातील बरेच खेळाडू आता येथे नाहीत, त्यातील काही निवृत्त झाले आहेत तर काहीना संघात स्थान मिळालेले नाही. कतारमधील या विश्वचषकात आम्ही नव्याने सुरुवात करणार आहोत. आताच्या क्रोएशिया संघात  आमच्याकडे ताज्या दमाचे नवीन तरुण खेळाडू आहेत. या नवीन तरुण खेळाडूंचा उत्साह, सळसळते रक्त आणि नवीन ऊर्जा हे संघासाठी प्रेरणादायक आणि लाभदायक ठरेल असे आम्हा सर्वांना वाटते.”

हेही वाचा :   FIFA World Cup 2022: फिफाच्या वनलव्ह आर्मबँड बंदीवर जर्मन फुटबॉल महासंघ कायदेशीर कारवाई करणार

लुका मॉड्रिक पुढे बोलताना म्हणाला, “आमच्याकडे काही दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी तरुण खेळाडूंना संघासोबत जुळवून घेण्यास मदत केली. ही एक नवीन स्पर्धा आहे आणि आम्हाला त्याकडे याच दृष्टीने पाहावे लागेल. मागच्या विश्वचषकात काय घडले हे सर्व विसरून आम्ही नव्याने फुटबॉलच्या मैदानात उतरणार आहोत.”

क्रोएशियाचा कर्णधार म्हणाला की, “ आमचा संघ खूप उर्जेने भरलेला आहे. सुरुवातीलाच काय पण हंगामाच्या शेवटी देखील संघातील कोणत्याही खेळाडूच्या चेहऱ्यावर तुम्हाला थकवा जाणवणार नाही, आजचा दिवस चांगला आहे की खराब याचा विचार आम्ही विश्वचषक संपल्यावर करू सध्या विश्वचषकातील सर्वच दिवस आमच्यासाठी चांगले आहेत.”

हेही वाचा :   IND vs BAN: जडेजाच्या जागी ‘या’ स्टार खेळाडूला बांगलादेश दौऱ्यावर कसोटी पदार्पणाची मिळू शकते संधी

लुका हा रिअल माद्रिद क्लबकडून सध्या खेळत आहे. त्याने गेल्या हंगामात त्याच्या क्लबला ‘ला लीगा आणि यूईएफए चॅम्पियन्स लीग या दोन्ही लीगमध्ये विजय मिळवून दिला होता. त्याने याचा आधार घेत सांगितले की, “मला अजूनही असे वाटते की माझ्याकडे वेगवेगळ्या क्लबच्या भरपूर ऑफर आहेत. मी शारीरिकदृष्ट्या अजूनही सक्षम असून उत्तम स्थितीत आहे. मला कुठलीही दुखापत झालेली नाही मी निरोगी आहे पण इतर विश्वचषकांशी तुलना करण्यात काही अर्थ नाही. जिंकण्यासाठी फक्त आत्मविश्वास आणि मानसिक सामर्थ्य या दोनच गोष्टींची आवश्यकता असते.”