महाराष्ट्राच्या महिला संघाने विजेतेपदाच्या दिशेने दमदार घोडदौड करताना दिल्लीचा १८-१३ असा पराभव केला आणि अव्वल राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. याचप्रमाणे हरयाणाने पंजाबला २२-१८ असे नामोहरम केले.
पाटणा येथील पाटलीपुत्र क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पध्रेत पुरुषांमध्ये हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. हरयाणाने धक्कादायक निकालाची नोंद करताना नऊ वेळा राष्ट्रीय विजेत्या भारतीय रेल्वेचे आव्हान संपुष्टात आणले. हा सामना नियोजित वेळे १६-१६ असा बरोबरीत सुटला. त्यानंतर पाच-पाच चढायांच्या डावात हरयाणाने रेल्वेला ७-४ अशा फरकाने हरवले. याप्रमाणे उत्तर प्रदेशने कर्नाटकचा १८-१४ असा पराभव केला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2014 रोजी प्रकाशित
अव्वल राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा : महाराष्ट्राच्या महिला उपांत्य फेरीत
महाराष्ट्राच्या महिला संघाने विजेतेपदाच्या दिशेने दमदार घोडदौड करताना दिल्लीचा १८-१३ असा पराभव केला आणि अव्वल राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
First published on: 24-01-2014 at 12:41 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First national kabaddi tournament maharashtra women in semifinals