India vs England: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत दोन्ही संघांतील फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला आहे. या मालिकेत फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी १२ तर इंग्लंडच्या फलंदाजांनी ७ असे एकूण १९ शतकं झळकावले आहेत. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना एकट्या गिलने ४ शतकं झळकावली आहेत. या शतकांसह त्याने ४०० धावांचा पल्ला गाठला आहे. गिल या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या नावे ७५४ धावा करण्याची नोंद आहे. यादरम्यान या मालिकेत एक दुर्मिळ विक्रम बनवला गेला आहे.

या मालिकेत भारतीय कर्णधार शुबमन गिलसह आणखी ४ फलंदाजांनी ४०० धावांचा पल्ला गाठला आहे. भारताकडून ५ तर इंग्लंडकडून एकूण ४ फलंदाजांनी ४०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यासह कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं आहे की, दोन्ही संघातील ९ फलंदाजांनी ४०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. याआधी १९७५-७६ मध्ये असं घडलं होतं. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात ८ फलंदाजांनी ८०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.

यासह १९९३ मध्ये झालेल्या ॲशेस मालिकेत एकूण ८ फलंदाजांनी ४०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. या मालिकेत फलंदाजी करताना केएल राहुलने ५३२, रवींद्र जडेजाने ५१६, ऋषभ पंत ४७९, बेन डकेट ४६२, जो रूटने ४५५, जेमी स्मिथने ४३२, यशस्वी जैस्वालने ४११ आणि हॅरी ब्रुकने ४०८ धावा केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडसमोर ३७४ धावांचं आव्हान आहे. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जॅक क्रॉउली आणि बेन डकेट यांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. बेन डकेटने ५४ धावांची खेळी केली. जॅक क्रॉउलेने १४ धावांची खेळी केली. तर हॅरी ब्रुकने शतकी खेळी केली. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी १०० हून कमी धावांची गरज आहे. इंग्लंडचा संघ मालिका जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.